
विलास खानोलकर
एक वेळ श्री समर्थांची स्वारी सेवेकऱ्यांसह वाडी गावी गेली. तेथे देशपांडे यांनी येऊन सर्व सेवेकऱ्यांसह भोजन घातले. सर्व सेवेकरी भोजन करून रात्री निद्रिस्त झाले. तेथे एक देवीचे उग्रस्थान होते. ती देवी उग्ररूप धारण करून जिकडे तिकडे त्रास देऊ लागली. त्यामुळे सर्व सेवेकऱ्यांस त्रास होऊ लागला. इतक्यात समर्थ जागृत होऊन म्हणाले, देवीला उशास घेतो. श्रींनी चोळाप्याचे भविष्य पूर्वीच सांगितले होते. त्याप्रमाणे मध्यान्ह रात्रीच्या समयास चोळाप्पास उपद्रव झाला. चोळाप्पा घाबरलेला पाहून सर्व मंडळीही घाबरली. चोळाप्पाच्या प्रेमाकरिता समर्थास भयंकर ताप भरला. नंतर देशपांडे यांनी समर्थास आपल्या गाडीतून अक्कलकोटास आणले. इकडे चोळाप्पाला अधिक त्रास होऊन (तो) शके १७९९ अश्विन शुद्ध नवमीस दिवसा इहलोक सोडून परलोकांत गेला. त्या दिवशी महाराजांस चैन नसून वृत्ती उदास होती.
राजपत्नीने श्रींस विचारले, महाराज, आज आपली वृत्ती उदास का झाली? समर्थ हळूहळू म्हणाले, काय करू? चोळ्याची संगत तुटली! तो वियोग सहन होत नाही गं! चोळ्यावाचून कोठे धावू? लीला कोणास दाखवू? आज सात जन्माचा सांगाती गेला गं! असे आम्हीही लवकरच जाऊ। हे ऐकून राणी साहेबांस फार वाईट वाटले. चोळाप्पा हा श्रींचा एकनिष्ठ भक्त होता. म्हणूनच महाराज चोळाप्पाची काळजी वाहत असत. असो. श्रींचे जे सेवक झाले, त्याची सर्वस्वी काळजी समर्थासच आहे. कितीही झाले, तरी आई-बाप क्षमा करतात. तसे समर्थाचे आहे. आमच्या हातून कितीही अपराध झाले, तरी निष्ठुरपणा किंवा विषमता या आईच्या (समर्थाच्या) हातून होत नाही. अशी श्रींची लीला अगाध होती.
स्वामींनी हाताळले अनेक रुग्ण स्वामींची भक्ती सुटका करे रुग्ण स्वामींच्या सेवेत जर असेल मनोरुग्ण भिऊ नको मंत्रजपाने पळत जाई रुग्ण ।। १।।
स्वामीभक्त चोळाप्पा झाला आणि रुग्ण अहोरात्र स्वामी त्याला वाचविण्यास मग्न, शेवटी यमराज घाबरला नेण्यास चोळाप्पा रुग्ण स्वामींनी परवानगी देता स्वर्गगमनाचे पूर्णस्वप्न ।। २।।
भक्त चोळाप्पा स्वामींचा दूतखास स्वामी आणि भक्त एकजीव एकमास चोळाप्पा करी स्वामी सेवा बारोमास कृष्णसुदामा कृष्णार्जुन सोळा तोळा खास ।। ३।।
रामभक्त हनुमान तसा त्याचा मान सर्व कारभार स्वामी करिती देऊन मान चोळाप्पाने न राखीला दुराभिमान चोळाप्पाने झेंडा रोविला चंद्रावर घेऊन चंद्रयान ।। ४।।
भक्तजन घ्या स्वामींचे नाम सातासमुद्रापार नेईल स्वामींचे नाम वल्हवा तुम्ही नाव घेऊन देवाचे नाम सुवर्णक्षरांनी कोरले हृदयात राम ।। ५।।
स्वामी समर्थ महाराज की जय
vilaskhanolkardo@gmail.com