मुंबईत नवे २०,१८१ रुग्ण

Share

मुंबई: गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत कोरोनाचे २०१८१ नवे रुग्ण आढळून आले तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे राज्यभरात गुरुवारी ३६२६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि १३ जणांना प्राण गमवावा लागला.

नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मुंबईत १ जानेवारीला करोना रुग्णसंख्या ६३४७ इतकी होती. ३ जानेवारीला हा आकडा ८०८२ इतका झाला होता. तर ५ जानेवारीला म्हणजे बुधवारी हा आकडा थेट १५१६६ इतका झाला होता. तर ६ जानेवारी म्हणजे आज मुंबईत एकाच दिवसात २०१८१ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत दिवसाला २० हजार रुग्ण सापडल्यास लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच मुंबईतील रुग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

कालच्या २०,१८१ रुग्णांमुळे मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण ७९,२६० एवढे झालेत. बरे झालेले रुग्ण २,८३७ एवढे असून ४ मृत्यूची नोंद आहे तर मुंबईतील सील बंद इमारतींची संख्या ५०२ झाली आहे.

२५९ कर्मचाऱ्यांचा कोविडमुळे मृत्यू

कोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या विविध खात्यातील २५९ अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी यांचा कोविड बाधा होऊन मृत्यू झाला आहे. २५९ पैकी २२२ कर्मचारी ,अधिकारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध झाले असून उर्वरित ३७ मृत अधिकारी, कर्मचारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध होणे बाकी आहे. आतापर्यंत एकूण ७ हजार ६८ अधिकारी व कर्मचारी यांना कोविडची बाधा झाली असून त्यापैकी ६ हजार ५२९ अधिकारी, कर्मचारी हे यशस्वी उपचारानंतर कोविड मुक्त झाले आहेत. अद्यापही २८० कोविड बाधित कर्मचारी, अधिकारी उपचार घेत आहेत. या मृत २५९ मध्ये, संवर्ग ‘अ’ मधील ४, ‘ब’ मधील १३,’क’ मधील ४४, ‘ड’ मधील १९८ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
..
१ जानेवारी ६,३४७
३ जानेवारी ८,०८२
५ जानेवारी १५,१६६
६ जानेवारी २०,१८१

Recent Posts

मनसे नेते अविनाश जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल…

मनसे नेते अविनाश जाधव यांनी झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला धमकावत पाच कोटी रुपयांची खंडणी…

34 mins ago

सरकारने हटवली कांदावरील निर्यात बंदी, बळीराजा सुखावला…

Onion Export: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने कांद्याच्या निर्यात धोरणात 'निषिद्ध' वरून 'मोफत' मध्ये सुधारणा…

1 hour ago

Prakash Ambedkar : काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही!

काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा आधी आघाडीची बोलणी झालेल्या काँग्रेसविषयी प्रकाश आंबेडकर…

2 hours ago

Amitabh Bachchan : ‘बिग बी’कडून कोस्टल रोड आणि शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक!

देवेंद्र फडणवीस यांनी फिल्मी स्टाईल मानले अमिताभ यांचे आभार मुंबई : बहुचर्चित असलेल्या मुंबई कोस्टल…

3 hours ago

LS Polls : महाराष्ट्रात ७ मे रोजी होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तिस-या टप्प्यातील ११ मतदारसंघांसाठी ७ मे रोजी…

4 hours ago