कुर्ला इमारत अपघातात १९ जणांचा मृत्यू

Share

मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील काल रात्रीच्या सुमारास इमारत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकाडा १९ वर गेला आहे. या ठिकाणी अद्यापही बचाव आणि मदतकार्य सुरू असून अजूनही अनेकजण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरात ही चार मजली धोकादायक इमारत होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. असे असतानाही त्यात ८ ते १० कुटुंबे राहत होती, सर्व भाडेकरू आहेत.

मुंबईतल्या कुर्ला भागात इमारत कोसळून झालेल्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना राज्याचे नगरविकास मंत्री आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनाग्रस्तांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांनी ही मदत जाहीर केली असून, जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Recent Posts

IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये आले रडू

मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…

1 min ago

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…

1 hour ago

Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…

3 hours ago

Mobile SIM Card : तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पण का?

नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…

3 hours ago

Paresh Rawal : मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी!

अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…

3 hours ago

IT Raid : अबब! पलंग, कपाट, पिशव्या आणि चपलांच्या बॉक्समध्ये दडवलेले तब्बल १०० कोटी!

दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…

4 hours ago