Friday, April 19, 2024
Homeदेशयोगी आदित्यनाथ गोरखपूर शहरमधून निवडणूक लढणार

योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरमधून निवडणूक लढणार

आज भाजपने  पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी भाजपने 57 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी निवडणूक होत असून भाजपने दुसऱ्या टप्प्यातील 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. एकूण भाजपने आज 105 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

दिल्लीत केंद्रीय समितीची  बैठक पार पडली. या बैठकीत 170 जागांवरील उमेदवारांच्या नावासाठी चर्चा झाली होती. अखेर भाजपने 105 नावांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे प्रयागराजच्या सिरातू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  उत्तर प्रदेशातील एकूण 403 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा हा 10 फेब्रुवारीला असणार आहे. त्यानंतर 14, 20, 23, 27 फेब्रुवारी त्यानंतर 3 आणि 7 मार्च अशी सात टप्प्यांत मतदान प्रकिर्या पार पडणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपी, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही राजकीय रॅली आणि रोड शोला परवानगी दिलेली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -