Thursday, March 28, 2024
Homeक्रीडापहिली कसोटी प्रेक्षकांविना

पहिली कसोटी प्रेक्षकांविना

ओमायक्रॉनच्या भीतीमुळे द. आफ्रिका बोर्डाचा सावध पवित्रा

सेंच्युरियन (वृत्तसंस्था):भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी प्रेक्षकांविना खेळली जाणार आहे. ओमायक्रॉनचे संकट पाहता ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी तिकीटांची विक्री केली नसल्याचे दक्षिण आफ्रिका बोर्डाने म्हटले आहे.

उभय संघांमधील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सेंच्युरियन येथे २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ओमायक्रॉनचे सावट पाहता या सामन्यासाठी मोजक्या आणि महत्त्वपूर्ण प्रतिनिधींना मैदानावर जाण्याची परवानगी दिली जाईल. दक्षिण आफ्रिकेतील कोरोना निर्बंधांमध्ये एका ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार लोकांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीमध्ये किमान दोन हजार प्रेक्षकांना प्रवेश मिळेल, असे वाटत होते. ओमायक्रॉन रुग्णांमध्ये घट झाली तर प्रेक्षकांची संख्या वाढेल असे सांगण्यात आले. मात्र, ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता प्रेक्षकांना परवानगी नाकारली आहे.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात इम्पीरियल वांडरर्स स्टेडियमवर खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षक येतील की नाही हे सध्या स्पष्ट नाही. या संदर्भात पुढील घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सेंच्युरियन स्टेडियमच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे.

भारताचा कसून सराव सुरू

दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेल्या भारताने मालिकेपूर्वी येथे सराव सुरू केला आहे. दौऱ्यावर जाण्यापूर्वी संघाला मुंबईत क्वारंटाइन करण्यात आले होते.

भारताचा संघ आठव्यांदा दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत आहे. जगातील हा एकमेव देश आहे जिथे भारतीय संघ अजूनही कसोटी मालिका जिंकलेला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेला संघ यंदा यावेळी इतिहास बदलेल, असा विश्वास चाहत्यांना वाटतो. भारताला साउथ आफ्रिकेत येथे तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर तीन वनडे सामन्यांची मालिकाही सुरू होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -