Tuesday, April 23, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गदै. प्रहार सिंधुदुर्ग आवृत्तीच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त सिंधुदुर्गात शुभेच्छांचा वर्षाव

दै. प्रहार सिंधुदुर्ग आवृत्तीच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त सिंधुदुर्गात शुभेच्छांचा वर्षाव

‘प्रहारचा’ वर्धापन दिन उत्साहात

कणकवली (प्रतिनिधी) : दै. प्रहार सिंधुदुर्ग आवृत्तीच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आणि प्रहारच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कणकवली येथील प्रहार भवनच्या कोकण विभागीय कार्यालयात यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. प्रहारचे संचालक आमदार नितेश राणे यांनी बुधवारी सकाळी यानिमित्ताने प्रहार कार्यालयास भेट देऊन सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

सायंकाळच्या सत्रात प्रांताधिकारी वैशाली राजमाने, नगराध्यक्ष समीर नलावडे, तहसीलदार रमेश पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिश गांगल, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे, अनाजी सावंत, प्रा. डॉ. शुभांगी माने तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई, बंडू गांगण, सुशील पारकर, नाटळ विकास सोसायटीचे चेअरमन नंदू सावंत, डॉ. विठ्ठल गाड, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचे दीपक बेलवलकर, दादा कुडतरकर, वृत्तपत्र एजंट संघटनेचे तालुका अध्यक्ष मालोजी कोकरे, केंद्रप्रमुख शिक्षक सभेचे पदाधिकारी अनंत राणे, युरेका सायन्स क्लबच्या अध्यक्षा सुषमा केणी, संध्या वायंगणकर, नीलिमा सावंत, कणकवली पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, आदी मान्यवरांनी सिने, नाट्य क्षेत्रातील कलावंतानी प्रहार कार्यालयात भेट देत शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, निवासी संपादक संतोष वायंगणकर यांसह प्रहारच्या विविध विंगचे प्रमुख, तालुका प्रतिनिधी यांनी वाचक हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी प्रहार परिवारातील प्रतिनिधी, वार्ताहर उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -