Thursday, April 25, 2024
Homeमहत्वाची बातमीSavarkar : सावरकर, देशभक्तच तरी शंका का?

Savarkar : सावरकर, देशभक्तच तरी शंका का?

वय वाढले, शरीर वाढले पण अकलेचा कांदा, अर्थात पप्पू! राजकारणातील पप्पू म्हणून संबोधले जाणारे राहुल गांधी स्वयं या म्हणण्यातील सत्यता अधोरेखित करताना स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांच्यावर नाहक घसरले.

एक सावरकर भक्त म्हणून व्यक्त होणे मला आवश्यक वाटले. सावरकर म्हणत, भारतीयांनी ब्रिटिश सेनेत भरती व्हावे, बंदुका आणि आधुनिक शस्त्र वापराचा अनुभव घ्यावा, युद्धाचा अनुभव घ्यावा. ते म्हणत, १८५७ चे बंड हे शस्त्रांसह झालेला उठाव होता. तो शमून गेला असे होता कामा नये, तो सतत पेटत-धगधगत राहावा. त्याची पुनरावृत्ती पुढे ब्रिटिश सेनेतील याच प्रशिक्षित भारतीय सैनिकांद्वारा त्यांच्याच बंदुका आणि शस्त्रास्त्रांसह व्हावी. देशास स्वातंत्र्य हे केवळ अहिंसेने मिळणे अशक्य. त्यासाठी शस्त्र हाती घ्यावीच लागतील. ब्रिटिशांचे मुडदे पाडावे लागतील. तेव्हाच ब्रिटिश भारतातून पाय काढतील. अशी दूरदृष्टी असलेले ज्वलंत विचारांचे सावरकर, ज्यांचे विचार आजही देशास योग्य दिशा दाखविण्यास परिपूर्ण आहेत. याच आमच्या क्रांतिवीर सावरकरांविषयी काँग्रेस अश्लीलतेकडे घसरणारी प्रदूषित टिप्पणी करते. म्हणते, यांनी अंदमान जेलमधून स्वतःची सुटका व्हावी म्हणून ब्रिटिशांची माफी मागत होते, तसेच सावरकरांना, “माफीवीर सावरकर” म्हणून हिणवते, काँग्रेसच्या अशा म्हणण्यात किती अर्थ राहतो? सावरकरांचे जीवन आणि विचारसरणी पाहिल्यास हे केवळ अशक्य आहे. बिनडोकपणाचा कळस आहे. यातून कटकारस्थानाची दुर्गंधी येते. स्वातंत्र्य लढ्यात जे कोणी महान क्रांतिकारी घडले, या सर्वांना सावरकरांची विचारसरणी आणि प्रेरणा कारणीभूत होती. सावरकर हे क्रांतिकारांचे मेरुमणी होते. अंदमानमध्ये खितपत पडण्यापेक्षा, सुटकेसाठी अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने, गनिमी काव्याने, येन-केन मार्गाचा अवलंब करून स्वतःची सुटका करून घ्यावी, त्यासाठी भले माफी मागून का होईना, सुटका होणे आवश्यक आणि देश स्वातंत्र्यासाठी पुन्हा खड्ग हाती घेऊ, “बचेंगे तो और भी लढेंगे” हाच गनिमी उद्देश त्यामागे होता. त्यांच्या हेतूविषयी, निष्ठेविषयी, श्रेष्ठतेविषयी शंका घ्यावी, अशी परिस्थिती निश्चितच नाही. भावना व्याकुळ समाजाला खचितच न पटणारी ही बाब आहे, केवळ अनाकलनीय.

येथे सावरकरांच्या देशप्रेमाची एक घटना मांडून काँग्रेसचे आरोप खोडून काढणे उचित ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना १९०६ साली ब्रिटिश सत्तेविरुद्ध मुंबई येथे भडकाऊ भाषण केले, असा आरोप ठेवून लंडनच्या व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशनवर १९१० सालात अटक करण्यात आली. येथेही सावरकर काही शांत राहणार नाही, या भीतीपोटी ब्रिटिशांना ते त्यांच्या देशात नको होते. त्यावेळी कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमध्ये होते. तेथूनही ते देश स्वातंत्र्यासाठी गनिमी काव्याने कार्यरत होते. ७ जुलै १९१० रोजी “मोरिया” नावाच्या जहाजातून ब्रिटिश पोलिसांच्या जंगी सुरक्षेत त्यांना भारतात आणले जात होते. ८ जुलै १९१० रोजी जहाज फ्रांसच्या “मार्सेल” बंदरावर थांबले होते. पहाटे ६.००च्या सुमारास प्रातर्विधीचे निमित्त करून ते शौचालयास गेले. दारात ब्रिटिश पहारेदार होते. परवानगी घेऊन त्यांनी दार आतून बंद केले. दारावर काच होती. स्वतःचे कपडे त्यावर टाकून ते झाकले. प्रकाशासाठी आत गोलाकार खिडकी होती. ती आकाराने शरीरापेक्षा लहान, त्याची काच फोडली आणि तेथून समुद्रात उडी घेतली. जखमा झाल्या, खरचटून अंगाची साले सोलली गेली. पहाटेची थंडी, खारे पाणी. तशात सावरकर किनाऱ्याच्या दिशेने पोहत निघाले. पहारेकऱ्यांच्या हे लक्षात आले. गोळ्यांचा वर्षाव झाला. एका लहान बोटीने त्यांचा पाठलाग सुरू झाला. अंदाजे २ किमी पोहून त्यांनी किनारा गाठला. पुढे १ किमी धावून ते फ्रेंच पोलिसांना स्वाधीन झाले.

फ्रान्सच्या भूमीवर ब्रिटिश त्यांना नियमानुसार अटक करू शकत नव्हते. कायदेतज्ज्ञ सावरकरांनी हा नियम मांडला. लाच देऊन ब्रिटिशांनी त्यांना पुन्हा बोटीवर आणले. पुढे भारतात त्यांना जन्मठेप व काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. सावरकरांच्या या धाडसी कृत्यास काँग्रेस काय म्हणेल? सावरकरांनी हे भीतीपोटी केलं? नव्हे, तर जेलमध्ये खितपत पडण्यापेक्षा सुटून पुन्हा लढण्याच्या जिद्दीने! हाच उद्देश अंदमान जेलमधून भले माफी मागून, पण बाहेर पडून देश स्वातंत्र्यासाठीच होता. तरीही सावरकरांनी ब्रिटिशांकडे माफी मागितली या भूमिकेवर काँग्रेस इतका ठाम का आहे? याचे एकमेव उत्तर म्हणजे, आम्ही हिंदू – मराठी माणसं एकवटून अशा अपमानांचा प्रतिकार करत नाही. स्वार्थासाठी स्वतःची भूमिका बदलत राहतो. त्याचबरोबर काँग्रेसी लोक देशस्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय नेहरू-गांधी-काँग्रेस यांच्यापुरते मर्यादित, सीमित ठेऊ इच्छिते. अहिंसेनेच स्वतंत्र प्राप्त झाले आणि त्यात क्रांतिकारांचे मोलाचे योगदान त्यांना ज्ञात असूनही ते मान्य करण्याचे धाडस ते दाखवू शकत नाहीत. यातच त्यांचे राजकीय हितसंबंध गुंतले आहेत. याच उद्देशाने ते सावरकरांसह सर्वच क्रांतिकारांना भले ते नेताजी सुभाषचंद्र बोस असोत, शहीद भगतसिंग – सुखदेव-राजगुरू, चंद्रशेखर आझाद असोत वा अन्य कोणी क्रांतिवीर असोत. अशा क्रांतिवीरांना ते जाणीवपूर्वक अपमानित करीत असतात. हिंदू-मराठी जणांनी लक्षात ठेवावे, जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या The Discovery of India / भारत एक खोज या आत्मचरित्रात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी असेच घृणास्पद लिखाण केले होते. महाराजांना डाकू, लुटेरे म्हणून संबोधित केले होते, त्यावेळी ज्या त्वेषाने हिंदू – मराठी माणूस पेटून उठला त्यास घाबरून छातीत धडकी भरल्याने नेहरूजींना महाराजांविषयीचे लिखाण पुस्तकातून काढून टाकावे लागले होते. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण व्हावी लागेल. नेहरू-गांधी या घराण्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील शूरांचा – क्रांतिकारांचा, हिंदू – मराठी माणसाचा द्वेषच केला आहे. यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हेही सुटले नाहीत. आज काँग्रेसी सावरकरांविषयी जे काही बरळतात आणि आम्ही असेच शांत राहिलो, तर पुढे पुन्हा शिवाजी महाराजांचा विषय उकरून काढण्यात ही मंडळी मागे- पुढे पाहणार नाही.

परमोच्च – पराकोटीचे देशभक्त असे हे आमचे सावरकर. त्यांच्यावर नीच-निक्कमे काँग्रेसी चिखलफेक करतात. लाज वाटते, त्यांच्या मतास दुजोरा देणाऱ्या महाराष्ट्रातील काँग्रेसींची अन् त्याहून लाज वाटते ती राहुल गांधींची गळाभेट घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांची. अभिमान वाटला असता, जर या गळाभेटीचे फलरूप शिवाजी महाराज अन् अफजल खान भेटीप्रमाणे झाले असते तर. उद्धवजी आपले आघाडी सरकार स्थापन होताना आपण त्याचे नामकरण “महाशिव आघाडी” असे केले होतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या यातील शिव शब्दावर घेतलेल्या आक्षेपानंतर त्याचे नामकरण “महाविकास आघाडी” झाले. हे आपण मुकाट्याने मान्य केलं. काँग्रेसचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विरोध शिरोधार्ह मानत त्यांना तिलांजली दिलीत.

सावरकरांप्रमाणेच काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराज यांचाही द्वेष करते. हे काँग्रेसच्या इतिहासातून स्पष्ट होते. जवाहरलाल नेहरू यांनी शिवाजी महाराजांना डाकू- लुटेरे म्हणून संबोधले आहेच. यानुसार पुढे आपल्या शिवसेना नावातील शिव या शब्दास जर आक्षेप घेतला गेल्यास, अशी शक्यता नाकारता येणार नाही, मग आपण पुढे काय कराल? आम्ही छाती ठोकपणे सांगतो, जर असे घडल्यास उद्धवजींची शिवसेना येथेही मूग गिळून गप्प राहील, नव्हे तर काँग्रेसचे हे म्हणणे योग्यच आहे असा पाठपुरावा देखील करतील. मराठी जन, अद्यापही आपण या शिवसेनेकडे बाळासाहेबांच्या विचारांच्या चष्म्यातून पाहत आहात. ती शिवसेना केव्हाच गतप्राण झालेली आहे. उरली आहे ती लाचार सोनिया सेना. शिवसैनिकहो हे असे वागणे बरे नव्हे, हाच आपल्या विनाशाचा वळणबिंदू (Turning Point) ठरणार हे निश्चित! पुढे पश्चाताप झालाच तर आपणास हात देणारा कोणी उरणार नाही. टोकाची भूमिका घेत आपण परतीचे सर्व दोर कापून टाकत आहात. सुरी सफरचंदावर पडो अथवा सफरचंद सुरीवर पडो, तुकडे सफरचंदाचेच होणार, सुरीचे काही बिघडणार नाही. थोडक्यात विद्वानांनी म्हटले आहेच, “विनाशकाले विपरीत बुद्धी” अर्थात: वास्तव्यात विनाशाची वेळ समीप येत असता बुद्धी विपरीत होत जाते.

“नेहरू को किताब लिखना था, तो ब्रिटिश सरकारने जेल में पुस्तकालय बनवा दिया। वीर सावरकरजीने कालकोठरी की दिवारों पर नाखुन और किल से १० हजार कवितायें लिखीं। साथ में रोज ७ किलोग्राम तेल निकाला कोल्हू से, अनेको यातनाएं सही, लगातार ११ वर्षो तक. देशद्रोही, देशभक्त आप स्वयं तय करे!”

-अरुण बेतकेकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -