Friday, March 29, 2024
Homeसाप्ताहिककोलाजवेट गेन अॅण्ड वेट लॉस

वेट गेन अॅण्ड वेट लॉस

डॉ. लीना राजवाडे

वाचक हो, शीर्षक वाचून आजच्या लेखाचा विषय काय असेल, हे लक्षात आले असेल.

वजन वाढणे हा विषय सध्या जागतिक पातळीवर महत्त्वाचा विषय ठरतो आहे.

शरीराचे वजन वाढते. यात पुढील काही मुद्दे आपल्या परिचयाचे असतील,

  • शरीरातील चरबी वाढते. खाण्या-पिण्याच्या सवयी, आधुनिक जीवनशैली याचा संबंध नव्हे; किंबहुना हेच वजन वाढण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे.
  • बायोलॉजिकल घटक जसे अनुवंशिकता, हारमोन्स यामुळेही वजन वाढते असेही संशोधन होत आहे.
  • याचबरोबर काही लोकांचे वजन कोणत्याही कारणाशिवाय वाढतेच असेही दिसते.

वरीलपैकी सगळ्या गोष्टी बरोबर आहेत; परंतु याबरोबर शरीराचे वजन म्हणजे नेमके काय हे समजले पाहिजे. वजन वाढणे किंवा कमी होणे याचा संबंध शारीरिक स्वास्थ्याशी असतो. शारीरिक हालचाल ही वजन कमी करणे आणि कमी झालेले वजन त्या स्थितीत ठेवणे यासाठी महत्त्वाचा विषय आहे. २०१७ साली अमेरिकन डायटेटिक असोसिएशन (ADA)ने प्रसिद्ध केलेल्या संशोधनात देखील हे नमूद केले आहे.

शरीराला मिळणारी ऊर्जा नियंत्रणात ठेवणे, haemostasis याचा आणि शरीराचे वजन, काम करण्याची ताकद यांचा घनिष्ट संबंध आहे. स्नायू बल हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. स्नायूची स्वत:ची ताकद, काम करण्याची क्षमता, endurance (strength, power) ही गोष्ट तहहयात वजन चांगले ठेवतानाही महत्त्वाची असते. शारीरिक हालचाल, विशिष्ट पद्धतीने केलेली हालचाल (structured physical activity) या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, हे ही निश्चित लक्षात घ्यायला हवे. आपले वजन कमी किंवा जास्त यापेक्षा आरोग्य पूर्ण ठेवण्याची मानसिकता व्हायला हवी.
वयानुसार वजन कसे बदलते हे समजले पाहिजे. ज्येष्ठ नागरिक यांनीदेखील वजनाकडे लक्ष दिले पाहिजे. आपण खातो ते अन्न, व्यायाम त्यातून मिळणारी ऊर्जा याचा संबंध असतो, हे ध्यानात ठेवले की, वजन नियंत्रणात ठेवताना काय खावे, त्याचबरोबर काय व्यायाम करायला हवा हे ठरवता येते.

शरीराचे वजन नेमके कशा पद्धतीने पाहायला हवे, हे आता पाहूया.

  •  संपूर्ण शरीरातील हाडे आणि स्नायूंचा जरी फक्त विचार केला, तर हाडे १५ टक्के आणि स्नायूचे वजन ७५-९० टक्के असणे अपेक्षित आहे.
  • अवयवानुसार बघितले, तर मेंदू हा सर्वात जास्त वजनदार ११८०-१६२१ ग्रॅम एवढ्या वजनाचा असतो. त्यानंतर क्रमाने यकृत, प्लीहा, फुप्फुसे, वृक्क हे अवयव वजनदार असतात.
  • एकूण वजनाचे विभाजन बघितले, तर शरीराचा मध्यभाग ४८ टक्के, मांड्या ५० टक्के, डोके व मान ४.८ टक्के असे असते.
  • आणखीन एक संशोधन मी या लेखाच्या निमित्ताने आपल्यासमोर मांडते आहे. माणसाच्या शरीर रचनेचा संबंध त्याचे आरोग्य आणि त्याला होणारे आजार या आनुषंगाने सूक्ष्म स्तरावर अभ्यास झालेला आहे. तो सामान्य माणसालाही खूपच विचार करण्यास उपयुक्त वाटतो म्हणून येथे थोडक्यात माहिती देते. वजनाचा विचार करताना याचा प्रत्येकाला सजगतेने विचार करता यावा, ही अपेक्षा आहे.

इंटरनेटवर याविषयी अधिक माहिती उत्सुक वाचकांना मिळू शकेल. शरीररचना ५ प्रकारांनी पाहता येते.
(National Institute on Aging and NIH Research-atomic, molecular, cellular, tissue and whole-body level. At atomic level six elements form 98% of the body mass, 61% oxygen, 23% carbon,10% hydrogen, 2.6% nitrogen and 1.4% calcium the remaining 2% of the mass consists of 44 other elements.) थोडक्यात अणू स्तरावर, पेशी स्तरावर या शरीरातील घटकात खातो ते अन्न, पाणी हवा याचे परिणमन होत असते. या प्रत्येक गोष्टीचा शरीर बलासाठी ऊर्जेसाठी महत्त्वाचा वाटा असतो. केवळ कर्बोदके प्रथिने आणि चरबीयुक्त पदार्थ याचा वजनाशी संबंध नसतो. वर सांगितलेल्या सर्व घटकांचाही असतो.

मी मागील एका लेखात बल किंवा ताकद तीन प्रकारची असते, असे सांगितले होते. त्यापैकी सहज म्हणजे जन्माचे वेळी मिळणारी ताकद ही आनुवांशिक असते. जन्मत: वजन चांगले असेल, तर नक्कीच पुढे आयुष्यात उपयोग होतो; परंतु म्हणून पुढे कसेही वागायला मोकळे असे मात्र समजता कामा नये. पुढील आयुष्यात वयपरत्वे तरुणपणात, मध्यम वयात काळजी घेतली पाहिजे. दिनचर्या, ऋतुचर्या याचे पालन केले पाहिजे. रोज करायच्या गोष्टी म्हणजे उठणे, खाणे, झोपणे, यंत्रांसारखे काम करणे नव्हे, तर वेळेवर शिस्तीने पद्धतशीर या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायला हवा. वेळेवर सकाळी उठले पाहिजे, रात्री वेळेवर झोपले पाहिजे. भूक वेळेवर लागण्यासाठी या गोष्टी सोबत निश्चित व्यायाम झालाच पाहिजे. यामुळे शरीराचे वजन भार न वाटता उत्साह आणि ऊर्जा देईल, याचा विश्वास वाटतो.

गरज आहे ती, स्वत:च्या वजनाला मर्यादेत ठेवणं ही माझी जबाबदारी या संकल्पाची. म्हणजे सवयीपेक्षा नेहमी योग्य दिशेनेच पाऊल टाकत आरोग्यपूर्ण सुखी आनंदी आयुष्याची वाटचाल वजनदार होऊ शकेल.

आजची गुरुकिल्ली

आपल्या शरीराचे संहनन योग्य प्रमाणात असावे.

असौ देहः समसंहननः भवेत्।

leena_rajwade@yahoo.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -