मुंबई (प्रतिनिधी) : जलवाहिनींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी येत्या मंगळवार आणि बुधवारी मुंबईतील काही भागांत पाणीपुरवठा (Water supply) बंद राहील, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

एल विभागात घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथील अशोक नगर, संजय नगर, सांता नगर, साने गुरुजी नगर, हिमालय सोसायटी, मिलिंद नगर, आंबेडकर नगर, सुंदर नगर, असल्फा, यादव नगर, साकीनाका पोस्ट ऑफिस, दुर्गामाता मंदीर मार्ग, जंगलेश्वर महादेव मंदीर मार्ग, लोयलका, भानुशाली वाडी, कुलकर्णी वाडी, चर्च गल्ली, संघर्ष नगर (सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) येथे दि. २९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील.

एस विभागात पवई उच्चस्तर जलाशय येथील गौतम नगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टरपाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे मार्ग, पवई (२४ तास – पाणीपुरवठा) येथे दि. २९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील.

मुंबई पालिकेतर्फे पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीच्या जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर X१८०० मिलीमीटर जोडकाम मंगळवार, २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून बुधवार, ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

Shirdi Saibaba trust : शिर्डीच्या साईबाबा संस्थानला १७५ कोटींचा आयकर माफ

या दरम्यान मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून बुधवार ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापर्यंत के/पूर्व, एच/पूर्व, एच/पश्चिम, पी/दक्षिण, एस, एल आणि एन या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील. तसेच के/पश्चिम विभागातील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित (बंद) राहील. के/पूर्व, जी/उत्तर, पी/दक्षिण विभागातील काही परिसरात २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तर एच/पश्चिम विभागातील काही परिसरात दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाणीपुरवठा कमी कालावधीसाठी होईल व काही परिसरात दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here