Friday, April 19, 2024
Homeताज्या घडामोडीआज रणधुमाळी, मतदानाला संमिश्र प्रतिसाद

आज रणधुमाळी, मतदानाला संमिश्र प्रतिसाद

भंडारा गोदिंया जिल्हा परिषद आणि १०५ नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान

मुंबई : महाराष्ट्रात आज १०५ नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. नगरपंचायत निवडणुकीसोबत सांगली, मिरज, कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक देखील होणार आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदेसह १५ पंचायत समित्यांची निवडणूक पार पडणार आहे. तर, नगरपालिकेच्या आणि ग्रामपंचायतीच्या काही जागांवर देखील पोटनिवडणूक होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. सोमवारी प्रचाराच्या फेऱ्या संपल्यानंतर मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र आले नसल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. स्थानिक पातळ्यांवर महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्यात सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना अपयश आल्याने, पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे स्थानिक पातळीवर सोयीस्कर आघाड्या करण्यावर राजकीय पक्षांनी भर दिला आहे.

राज्यातील मंडणगड, दापोली (रत्नागिरी), कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ (सिंधुदुर्ग), देहू (पुणे), लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी (सातारा), कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ (सांगली), सोलापूरमधील माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर वैराग, नातेपुते या नगरपंचायतीच्या निवडणुकींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

तसेच भंडारा जिल्हा परिषदेच्या ३९ जागांसाठी, पंचायत समितीच्या ७९ जागा तर नगर पंचायतीच्या ३९ जागांसाठी तर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४३ जागा, नगर पंचायतीच्या ८९ जागा तर पंचायत समितीच्या ४५ जागांसाठी हे मतदान होत आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणामुळे नगरपंचायतींसह सर्व निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव राज्य मंत्रीमंडळाने केला होता, न्यायालयाने मात्र इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला नकार दिल्याने निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या आदेशानुसारच ओबीसी आरक्षण रद्द करुन निवडणूक घेण्याचे जाहीर केले. ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याबाबत आयोगाकडूनही काहीही सूचना न आल्याने ओबीसी वगळता इतर जागांसाठी नियोजनानुसार नगरपंचायत निवडणूक होत आहे.

महाराष्ट्रातील या नगरपंचायतीसाठी मतदान

ठाणे- मुरबाड व शहापूर,
पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा,
रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित),
रत्नागिरी- मंडणगड, दापोली,
सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ,
पुणे- देहू (नवनिर्मित),
सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी,
सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ,
सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित),
नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा,
धुळे- साक्री,
नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ,
अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी,
जळगाव- बोदवड
औरंगाबाद- सोयगाव
जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित),
परभणी- पालम,
बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी,
लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ,
उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु.,
नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर,
हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ,
अमरावती- भातकुली, तिवसा,
बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा,
यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी,
वाशिम- मानोरा,
नागपूर- हिंगणा, कुही,
वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर,
भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर,
गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली,
चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा,
गडचिरोली- एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.

नगरपालिका पोटनिवडणूक

शिरोळ, नागभीड, जत, सिल्लोड, फुलंब्री, वानाडोंगरी आणि ढाणकी या नगरपरिषदांमधील रिक्त जागांची पोटनिवडणूक देखील होणार आहे. नंगरपंचायत निवडणुकीसोबत सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक देखील होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -