Thursday, April 25, 2024
Homeताज्या घडामोडीकसं कराल लहान मुलांचं लसीकरण ?

कसं कराल लहान मुलांचं लसीकरण ?

मुंबई : लहान मुलांसाठी   वॅक्सिनचा स्लॉट रजिस्टर करण्यासाठी CoWIN पोर्टल (cowin.gov.in) वर लॉगइन करा. आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाचा उपयोग करुन रजिस्ट्रेशन करा. विद्यार्थी शाळेच्या आयकार्डचा वापरही करु शकतात.

रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी 3 जनवरी, 2022 पासून लसीकरणासाठी सेंटर शोधू शकतील. तसेच अपॉइंटमेंट बुक करु शकतील. पोर्टलवर राज्य, जिल्हा किंवा शहरानुसार जवळचं लसीकरण केंद्र उपलब्ध होईल. त्यासोबतच पोर्टलवर Google मॅपवर जवळचं लसीकरण केंद्र शोधता येईल.

 नोंदणी कशी कराल?

  • कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
  • नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.
  • वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Register / Sign in yourself या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.
  • त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
  • लसीकरणासाठी तुम्हाला नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र स्लॉट बुक करावा लागेल.
  • पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला तिथल्या लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.
  • तुम्ही जिल्हावार किंवा तुमच्या शहरानुसार यादीही शोधू शकता.
  • तुम्हाला एखाद्या लसीकरण केंद्रावर स्लॉट उपलब्ध आहेत वा नाहीत, हे दिसेल. स्लॉट्स उपलब्ध असल्यास ते कोणत्या वयोगटासाठी आहेत, कोणती लस उपलब्ध आहे, हे देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
  • तुमच्या वयोगटासाठी हा स्लॉट उपलब्ध असल्यास तुम्ही तो बुक करू शकता. तसा मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -