Saturday, April 20, 2024
Homeताज्या घडामोडीकापडे येथे १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरणाचा शुभारंभ

कापडे येथे १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरणाचा शुभारंभ

पोलादपूर  :तालुक्यातील कापडे बुद्रुक येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ नुकताच झाला. येथील नामवंत रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हनुमंत जगताप, राजिप सदस्य सुमन कुंभार आणि चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कापडे बुद्रुक येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठीच्या लसीकरणाचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष हनुमंत जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य व माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, जिल्हा परिषद सदस्या सुमन कुंभारहे व्यासपीठावर हजर होते. या लसीकरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वरदायिनी, माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष सि. दौ. सकपाळ यांनी भुषविले. तर संस्थेचे सहकार्यवाहक महेंद्र पाटेकर, विश्वस्त संजय मेहता, पोलादपूर पंचायत समितीचे उपसभापती शैलेश सलागरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, प्राचार्य रविकांत सकपाळ, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय सलागरे, रामदास सकपाळ, संतोष सकपाळ व सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होता. लसीकरणाला प्रारंभ हाेताच १५ ते १८ या वयोगटातील मुलांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली. तसेच त्यांनी शिस्तीने रांगेत उभे राहून लस घेतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -