Thursday, March 28, 2024
Homeदेशairlines : अमेरिकेने ६ विमान कंपन्यांना ठोठावला दंड

airlines : अमेरिकेने ६ विमान कंपन्यांना ठोठावला दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेने ६ विमान (airlines) कंपन्यांना दंड ठोठावला आहे. यूएस परिवहन विभागाच्या वतीने सांगण्यात आले की, एअर इंडिया ही कंपनी देखील दंड झालेल्या एअरलाइन्सपैकी एक आहे. ज्यांनी एकूण रु. ४,८६५ कोटी परतावा, रु. ५८ कोटी दंड भरण्याचे मान्य केले आहे.

एअर इंडिया व्यतिरिक्त, दंड ठोठावण्यात आलेल्या इतर एअरलाइन्समध्ये फ्रंटियर, टीएपी पोर्तुगाल, एरो मेक्सिको, इआय एआय आणि एविएनका यांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, एअर इंडियाचे ‘रिफंड ऑन रिक्वेस्ट’ हे धोरण परिवहन विभागाच्या धोरणाच्या विरोधात आहे. जे हवाई वाहकांना तिकिटांचे पैसे रद्द झाल्यास आणि उड्डाणे बदलल्यास कायदेशीररीत्या परत करणे बंधनकारक करते. ज्या प्रकरणांमध्ये एअर इंडियाने परतावा आणि दंड भरण्याचे मान्य केले आहे ते टाटा समूहाने राष्ट्रीय वाहक ताब्यात घेण्यापूर्वीचे आहेत.

एअर इंडियाने परिवहन विभागाकडे दाखल केलेल्या १,९०० रिफंड तक्रारींपैकी निम्म्याहून अधिक तक्रारींवर प्रक्रिया करण्यासाठी १०० दिवसांपेक्षा जास्त वेळ लागला, असे अधिकृत तपासात समोर आले आहे. या तक्रारी वाहकाने रद्द केलेल्या किंवा बदललेल्या फ्लाइट्सच्या होत्या. ज्या प्रवाशांनी तक्रारी नोंदवल्या आणि थेट वाहकाकडून परताव्याची विनंती केली, अशा प्रवाशांच्या परताव्याची प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या वेळेबद्दल एअर इंडिया एजन्सीला माहिती देऊ शकली नाही.

यूएस डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशनने म्हटले आहे की, ‘रिफंड पॉलिसी जाहीर करूनही एअर इंडियाने प्रवाशांना वेळेवर परतावा दिला नाही. परतावा मिळण्यास विलंब होत असल्याने ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -