Tuesday, April 16, 2024
Homeताज्या घडामोडीयूपीएससी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

यूपीएससी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

देशात श्रुती शर्माने मारली बाजी

मुंबई : यूपीएससी २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यूपीएससी तर्फे जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये श्रुती शर्माने ऑल इंडिया रँकमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

यूपीएससी सीएसई प्राथमिक परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी झाली आणि परीक्षेचा निकाल २९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. मुख्य परीक्षा २०२२ हा ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल १७ मार्च २०२२ रोजी घोषित करण्यात आला. ५ एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि २६ मे रोजी संपलेल्या यूपीएससी परीक्षेची मुलाखत ही शेवटची फेरी होती.

प्रिलिम्स, मेन्स आणि त्यानंतर मुलाखतीच्या सर्व परीक्षा पास जरून यूपीएससी तर्फे देशातून ६८५ उमेदवारांना अपॉईंट करण्यात येणार आहे. यामध्ये Indian Administrative Service; Indian Foreign Service, Indian Police Service and Central Services, Group ‘A’ and Group ‘B’ या विभागांसाठी उमेदवारांची निवड केली आहे.

यामध्ये २४४ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत तर ७३ उमेदवार हे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आहेत. २०३ उमेदवार हे ओबीसी प्रवर्गातील आहेत तर १०५ उमेदवार हे एससी प्रवर्गातील आहेत. एसटी प्रवर्गातील ६० उमेदवार आहेत असे एकूण ६८५ उमेदवार हे सिव्हिल सर्व्हिसेससाठी अपॉईंट करण्यात येणार आहेत. तसेच यूपीएससी तर्फे ६३ उमेदवारांना रिझर्व्ह विभागात ठेवण्यात आले आहे.

आज जाहीर झालेल्या अंतिम निकालात श्रुती शर्माने ऑल इंडिया रँक १ मिळवला आहे. या वर्षी सर्व टॉप तीन पोझिशन्स मुली उमेदवारांनी मिळवल्या आहेत. श्रुती सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे आणि ती जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादमीमध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -