Friday, March 29, 2024
Homeमहत्वाची बातमीरिक्षात विसरलेली बॅग मालकाला केली परत

रिक्षात विसरलेली बॅग मालकाला केली परत

शेखर भोसले

मुलुंडमध्ये रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात प्रवाशाने विसरलेली बॅग परत करत प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे. हा प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या आनंद चंद्रकांत भोळे या रिक्षाचालकाचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

मुलुंड पूर्वेतील रिक्षा चालक आनंद चंद्रकांत भोळे यांच्या रिक्षात शुक्रवारी मुलुंड पश्चिम येथील तांबे नगर परिसरात राहणारे सत्यवान रावराणे हे त्यांच्या बँकेतील कामानिमित्त प्रवास करत होते. त्यांनी एक हँड बॅग सोबत घेतली होती व या बॅगेत बँकेचे पासबुक, मुदत ठेवीचे सर्टिफिकेट, ८० हजार रुपये रोख रक्कम व इतर सामान होते. त्यांचे गंतव्य ठिकाण येताच ते रिक्षातून उतरले परंतु उतरताना ते आपली बॅग रिक्षातच विसरले. रिक्षा थोडी पुढे आल्यावर रिक्षाचालक आनंद भोळे यांनी कामानिमित्त आपली रिक्षा एका ठिकाणी थांबवली असता त्यांना त्यांच्या रिक्षात ही बॅग दिसली. त्यांनी रिक्षातून उतरलेल्या बॅगेच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती व्यक्ती न दिसल्याने प्रामाणिक रिक्षा चालकाने मुलुंड पूर्वेतील स्टेशन जवळील शिवसेना शाखेत बॅग आणून दिली व घडलेली घटना कथन केली.

बॅग मालकाचे नाव आणि संपर्क क्रमांक बघण्यासाठी बॅगेतील कागदपत्रे बघितली असता सत्यवान रावराणे हे बॅग मालकाचे नाव असल्याचे आढळून आले तसेच आतील कागदपत्रांद्वारे त्यांचा मोबाईल नंबर देखील मिळाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -