ठाणे प्रहार

विभाजनातूनच विकासाची गंगा!

lake in thane

नामकरण आणि जिल्हा मुख्यालय कोठे असावे, हा ठाणे विभाजन वा त्रिभाजनाचा सगळयात कळीचा मुद्दा आहे. त्यावर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी एकत्र बसून तोडगा काढणे गरजेचे आहे. तो जेवढया लवकर निघेल तेवढया लवकर या परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या दैनंदिन गरजा पूर्ण होतील. जव्हार-मोखाडयाच्या दुर्गमातील दुर्गम पाडयात राहणा-या आदिवासी माणसापर्यंत प्रशासन आणि त्यापाठोपाठ विकासाची गंगा पोहोचेल..

ठाणे बदलले.. जुने हरवले!

old thane district office

ठाणे स्टेशन परिसरात फेरफटका मारताना आज जुन्या पिढीतील ठाणेकरांचे मन कावरेबावरे होऊन जाते. नव्याचा आनंद घेताना जुने हरविल्याची रुखरुख आहे.

 

समृद्ध डोंबिवली

Gudi padwa

कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, संस्कृती आणि समाजकारण या सार्वजनिक जीवनातील सर्वच क्षेत्रात संवेदनशीलता जपणारी जी शहरे महाराष्ट्रात आहेत, त्यात डोंबिवलीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. भाषाप्रभू पु. भा. भावे आणि ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांच्यामुळेच डोंबिवलीला साहित्यिक वारसा लाभला आहे. त्यामुळे शन्नांची, भावेंची डोंबिवली अशी साहित्यक्षेत्रात या शहराची ओळख आहे. कला, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता अशा […]

उद्योगनगरी उल्हासनगर

Industry

देशाची फाळणी होण्यापूर्वी उल्हासनगर शहर म्हणजे कल्याण कॅम्प, ब्रिटिश सैनिकांची वसाहत होती. शहराचा बहुतांशी भाग दलदलीने भरलेला होता. १९४२ मध्ये सुमारे सहा हजार ब्रिटिश सैनिकांना राहण्यासाठी इंग्रजांनी या ठिकाणी दोन हजार बराकी बांधल्या. याच बराकींमधून हळूहळू उद्योगव्यवसायांचे, बाजारपेठेचे, लघुउद्योगांचे उल्हासनगर हे शहर आकाराला आले.

वैविध्यपूर्ण पालघर

kelva beach

पालघर तालुक्याला समुद्रकिनारा लाभल्यामुळे मासेमारी व्यवसाय वाढला. बंदरे उभारण्यात आली. या विकासाच्या प्रक्रियेत नगरीकरणाच्या नव्या समस्याही निर्माण झाल्या. त्यामुळे नियोजनबद्ध विकासाची गरज पालघर शहर परिसरासाठी आवश्यक बाब बनली आहे. येत्या काळात मच्छीमारी, पर्यटन, शेती आदी दृष्टिकोनातून विकासाची पावले पडण्याची गरज आहे.

ऐतिहासिक मुरबाडची ओळख बदलतेय

tampel

ठाणे जिल्ह्यातील सिद्धगड ते आजपर्यंत पसरलेल्या मुरबाड तालुक्याची ओळख अलीकडच्या काळात बदलू लागली आहे. तालुक्यात बांधकाम व्यावसायिकांनी आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तालुक्यात अधिकृत व अनधिकृत बांधकामेही फोफावली आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या तालुक्याची ओळख येथील निसर्गसौंदर्यामुळेही आहे. मात्र, वाढते नागरीकरण व बांधकामांमुळे ही ओळख बदलून बांधकामांचे शहर अशी मुरबाडची नवी ओळख होऊ […]

कलासक्त कल्याण

gayan samaj

कल्याण शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. शहराचे अस्तित्व हजारो वर्षापासून आहे. प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने ही भूमी पवित्र झाली असल्याचे म्हटले जाते. शककर्ता शालिवाहनाची ही भूमी आहे. संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेल्या सहजानंद मुनींनीही येथे समाधी घेतली आहे. शिवाजी महाराजांनी मराठी आरमाराची स्थापनाही कल्याणमध्ये केली होती.

पर्यटन विकास आराखड्याविरोधात एल्गार

utan bhayander

नैसर्गिक पर्यावरणाचा विनाश करणा-या एमएमआरडीएच्या विकास आराखड्याविरोधात उत्तनच्या ‘धारावी बेट बचाव समिती’च्या माध्यमातून स्थानिक ग्रामस्थांनी आवाज उठवला असून, एक ऑगस्ट रोजी या आंदोलनाची सुरुवात उत्तन येथील कोळी जमात भवन हॉलमधील जाहीर परिषदेतून होणार आहे.

असा घडत गेला ठाणे जिल्हा…

thane before

ब्रिटीशांनी १८१७ मध्ये पेशव्यांकडून ठाणे जिल्हा काबीज केला आणि उत्तर कोकण जिल्ह्याचा ठाणे हा एक भाग बनला. बदलत्या काळानुसार ठाणे जिल्ह्याचे रुपडेही बदलले. ‘ठाणे प्रहार’ आवृत्तीच्या निमित्ताने या बदललेल्या ठाणे जिल्ह्याचा घेतलेला हा आढावा…