Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीशिक्षकांनी स्वयं मूल्यांकन देखील करावे

शिक्षकांनी स्वयं मूल्यांकन देखील करावे

भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन  

मुंबई : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून अध्ययन केवळ विद्यार्थ्यांनीच करावे असे नसून शिक्षकांनी देखील सातत्याने अध्ययन करून अद्ययावत राहिले पाहिजे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी स्वयं मूल्यांकन देखील केले पाहिजे.  त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता विकास साधला जाईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी केले.  कांदिवली येथील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंगळवारी ‘नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल बोलत होते.

कार्यक्रमाला ठाकूर महाविद्यालयाचे सचिव जितेंद्र सिंह ठाकूर, कोषाध्यक्ष राजकुमार सिंह, विश्वस्त रमेश सिंह, प्राचार्या डॉ. चैताली चक्रवर्ती, उपप्राचार्य निशिकांत झा, विशेष निमंत्रक प्राचार्या डॉ. शोभना वासुदेवन व डॉ. ए एम पुराणिक तसेच प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षणाशी निगडित सर्व गटांशी व्यापक विचार विमर्श करून तयार करण्यात आले असून या धोरणात विद्यार्थ्यांना सुरुवातीची काही वर्षे मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला आहे, असे सांगताना जपान किंवा चीन या देशात आरंभीचे शिक्षण मातृभाषेतच दिले जाते याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -