Friday, March 29, 2024
HomeदेशIndian Air Force : भारतीय हवाई दलात टाटा नेक्सॉनचा इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा

Indian Air Force : भारतीय हवाई दलात टाटा नेक्सॉनचा इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा

एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी दाखवला हिरवा झेंडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) टाटा नेक्सॉनचा इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा सामील झाला आहे. एएनआयच्या म्हणण्यानुसार, ग्रीन मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक वाहनांच्या तुकडीला भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत १२ इलेक्ट्रिक वाहनांच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. भारतीय हवाई दल आपल्या ताफ्यात ई-वाहने खरेदी आणि वापरण्याच्या योजनांसह पुढे पाऊल टाकत आहे.

Thackeray : ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

भारतीय वायुसेना पारंपारिक वाहनांच्या जागी इलेक्ट्रिक वाहने आणण्याचा प्रयत्न करत आहे. हवाई दलाच्या विविध तळांवर चार्जिंग पायाभूत सुविधा उभारण्यासह ई-वाहन इकोसिस्टमचा विस्तार करण्याच्या योजना आहेत. इलेक्ट्रिक कारची पहिली तुकडी दिल्ली एनसीआर युनिट्समध्ये कार्यक्षमता निरीक्षण आणि विश्लेषणासाठी तैनात केली जाईल.

इलेक्ट्रिक बस आणि इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी भारतीय हवाई दल भारतीय लष्कराशीही बोलणी करत आहे. या अंतर्गत आता हवाई दल आपल्या वाहनांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश करणार आहे. ज्यामुळे ग्रीन मोबिलिटी सुरू होण्यास मदत होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -