Friday, March 29, 2024
HomeमनोरंजनLOVE : प्रेम सांगून होत नाही आणि ठरवून करता येत नाही

LOVE : प्रेम सांगून होत नाही आणि ठरवून करता येत नाही

Swapnil Joshi : स्वप्नील जोशीचा तो व्हिडिओ व्हायरल

मुंबई : प्रेम (LOVE) म्हणजे काय? प्रेम हे सांगून होत नाही… आणि प्रेम हे ठरवून करता येत नाही… सर्वात महत्वाचं म्हणजे आताच क्षण जगून घ्या… पुढे काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही… मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या अभिनेता स्वप्नील जोशीचा (Swapnil Joshi) हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

मराठीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी, सध्या बराच चर्चेत आहे. मध्यंतरी केलेली पायी वारी असो, ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये विशेष भूमिका असो किंवा ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतील सौरभ पटवर्धन. स्वप्नील हा कायमच प्रेक्षकांना भावाला आहे. विशेष म्हणजे यशाच्या इतक्या मोठ्या शिखरावर असूनही तो सर्वांशी आपुलकीने वागताना दिसतो. आज त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही खुलासे केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

स्वप्नील जोशी याने लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम केले आहे. आजवर त्याने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रत्येक भूमिकेने त्याला एक वेगळी ओळख दिली आहे आणि प्रत्येक भूमिकेतून त्यातून तो काही तरी शिकत आला आहे, याच विषयी तो एका मुलाखतीत बोलला आहे. नुकतीच त्याने ही मुलाखत सोशल मिडियावर शेयर केली आहे.

स्वप्नीलने अभिनयाची सुरुवात वयाच्या नवव्या वर्षी केली. त्याने रामानंद सागर यांच्या ‘उत्तर रामायण’ या टीव्ही मालिकेत रामपुत्र कुशची भूमिका साकारली होती. तिथूनच त्याच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर त्याने रामानंद सागर यांच्याच ‘श्रीकृष्ण’ या हिंदी मालिकेमध्ये भगवान श्रीकृष्णाची भूमिका केली होती. स्वप्नीलच्या या दोन्ही भूमिका चांगल्या गाजल्या होत्या. त्याशिवाय एका लग्नाची दुसरी गोष्ट, मुंबई पुणे मुंबई, मितवा, तु ही रे, अशी न संपणारी लिस्ट आहे.

२०१३ साली संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटातील स्वप्नीलच्या अभिनयाने लोकांचा मनात कायमचं घर केलं आहे.

एका मुलाखतीत अमृता खानविलकरने स्वप्नीला त्याच्या वेग वेगळ्या भूमिकेतून तो काय शिकला हा प्रश्न विचारला, स्वप्नीलने मस्त उत्तर दिले, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट मधल्या घणाने मला साधेपणा शिकवला, दुनियादारीतल्या श्रेयस ने मैत्री.. दुनियादारी शिकवली.’

मुंबई पुणे मुंबई मधल्या गौतमने ‘प्रेम म्हणजे काय? प्रेम हे सांगून होत नाही.. आणि प्रेम हे ठरवून करता येत नाही’ हे शिकवलं आणि सर्वात महत्वाचं मी श्री कृष्णाच्या भूमिकेतून शिकलो ते म्हणजे ‘आताच क्षण जगून घ्या.. पुढे काय होईल ही आपल्याला सांगता येत नाही.’ स्वप्नीलचा हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

हे सुद्धा नक्की वाचा : स्वप्नील जोशी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -