नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या चांगलाच फॉर्मात असलेला भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव ८९० गुणांसह आयसीसी टी-२० (T-20) फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान ८३६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीसीने नुकतीच टी-२० फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे.

सूर्यकुमार यादवने अलीकडच्या काळात टी-२० क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात त्याने बऱ्याच धावा केल्या असून न्यूझीलंडविरुद्धही त्याने नुकतेच टी-२० शतक ठोकले आहे. न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वेचे ७८८ रेटिंग गुण असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ७७८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम ७४८ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

याशिवाय इंग्लंडचा डेव्हिड मलान ७१९ गुणांसह सहाव्या, न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स ६९९ गुणांसह सातव्या, दक्षिण आफ्रिकेचा रिले रोसो ६९३ गुणांसह आठव्या, ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच ६८० गुणांसह नवव्या आणि श्रीलंकेचा पाथुम निसांका ६७३ गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here