Friday, April 19, 2024
Homeविदेशनासाच्या ‘लुसी’ यानाचे यशस्वी प्रक्षेपण

नासाच्या ‘लुसी’ यानाचे यशस्वी प्रक्षेपण

फ्लोरिडा : सूर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी नासाच्या आणखी एका मोहिमेतील एक भाग म्हणून सुमारे १५०० किलो वजनाचे आणि ६ मीटर लांबीचे दोन सोलर पॅनल असलेले ‘लुसी’ यान ‘एटलास-५’ या प्रक्षेपकाने अमेरिकेतील फ्लोरिडा येथील अवकाश तळावरुन यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केले. हे यान पुढील १२ वर्ष प्रवास करत गुरु ग्रहाजवळ असलेल्या ८ विविध लघुग्रहांजवळून जात त्यांची छायाचित्रे काढणार आहे. यामधून या लघुग्रहांचा अभ्यास केला जाणार आहे. आफ्रिकेतील इथियोपिया देशामध्ये १९७४ च्या सुमारास एका मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले होते. अभ्यासाअंती हे अवशेष तब्बल ३२ लाख वर्षांपूर्वीचे असल्याचं स्पष्ट झाले. हा सांगाडा महिलेचा असल्याचंही नंतर लक्षात आलं. तेव्हाच्या एका प्रसिद्ध गाण्यातील एक शब्द वापरत ‘लुसी’ हे नाव या महिलेच्या सांगड्याला देण्यात आले. या अवशेषांमुळे मानवशास्त्र अभ्यासाची दिशा बदलून गेली. तेव्हा हेच नाव नासाने या यानाला दिलं आहे. हे यान सूर्यमालेबद्दलच्या अभ्यासाची दिशा बदलवेल अशी अपेक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -