Thursday, April 25, 2024
Homeमहत्वाची बातमीदेशाच्या इतिहासाची विद्यार्थ्यांना जाणीव करून द्यावी

देशाच्या इतिहासाची विद्यार्थ्यांना जाणीव करून द्यावी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिक्षकांना सूचना

नागपूर (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात नागपूर महापालिका शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षकांनी देशाच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करुन द्यावी. त्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इतिहासावर आधारित चित्रपट दाखवावे. तसेच इतर माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशाच्या इतिहासाबद्दल ज्ञान वाढवावे, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या.

नितीन गडकरी नागपुरात महानगरपालिकेने आयोजित केलेल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या शिलालेखाच्या लोकार्पण समारंभात बोलत होते. विशेष म्हणजे हे वर्ष “विश्वविजयी तिरंगा प्यारा” या झेंडा गीताचे रचयिता श्यामलाल गुप्त यांची १२५ व्या जयंतीचे ही वर्ष आहे. त्यानिमित्ताने महानगरपालिकेने रविवारी नागपूर शहरात अनेक ठिकाणी सामूहिक झेंडा गीताचे गायन ही आयोजित केले होते.

नागपूरच्या संविधान चौकात राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेही सामूहिक झेंडा गीताच्या गायनात सहभागी झाले. विद्यार्थीदशेत अशा कार्यक्रमांचा अनुभव विद्यार्थ्यांना इतिहास संदर्भात गोडी निर्माण करणारा ठरतो, असे गडकरी म्हणाले.

महापालिकेच्या शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना देशाच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव शिक्षकांनी करुन द्यावी. त्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इतिहासावर आधारित चित्रपट दाखवावे. इतरही माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशाच्या इतिहासाबद्दल माहिती गोळा करावी, वाचन करावं, ज्ञान वाढवावे. संविधानाच्या शिलालेखाचे उदघाटन झाले. ज्या चौकात बाबासाहेबांचा पुतळा आहे, त्याच्या समोर संविधान शिलालेख निर्माण झाला हा सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या गौरवशाली इतिहासात याची नोंद होईल. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त प्रत्येक वस्तीत आयोजित झाले पाहिजे. मी विद्यार्थी होतो तेव्हा स्वातंत्र्य या विषयावर अभ्यास केला आणि त्यावेळी मला पुरस्कार मिळाला. लोकांच्या मनात देशप्रेम जागविणे आपले काम आहे, असेही गडकरी म्हणाले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, या ठिकाणी उभारण्यात आलेली संविधानाची उद्देशिका नागरिकांना संविधानाचे महत्त्व पटवून दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -