Thursday, April 25, 2024
Homeताज्या घडामोडीमोकळ्या जागांवरील पार्ट्यांसाठी राज्य सरकारची कठोर निर्बंध

मोकळ्या जागांवरील पार्ट्यांसाठी राज्य सरकारची कठोर निर्बंध

मुंबई : ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध घातले आहेत. मुंबईत (Mumbai) मोकळ्या जागी येथे होणाऱ्या जंगी कार्यक्रमांना केवळ २०० लोकांनाच परवानगी देण्यात आल्याची माहिती आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितली.

बँन्क्वेट हॉल, बंदीस्त जागी क्षमतेच्या ५० टक्के  मर्यादेपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. तर मोकळ्या जागांवर क्षमतेच्या २५ टक्के लोकांनाच परवानगी मिळणार आहे. याचबरोबर घरी होणाऱ्या पार्ट्यांवर देखील पालिकेची नजर असणार आहे. लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे असे आवाहनही आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केले आहे.

 

नियमावलीतील काही ठळक वैशिष्ट्ये

१) बंदीस्त सभागृह, बंदिस्त रेस्टॉरंट, हॉलमध्ये ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. 

२) मोकळ्या जागी २५ टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
 
 

३) ३१ डिसेंबर आणि ख्रिसमस निमीत्त होणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवण्याकरता  प्रत्येक वॉर्डमध्ये महापालिकेची ४ पथकं तैनात असतील.


४) नियम मोडणाऱ्या पार्ट्या आढळल्यास संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेल मालक यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.


३१ डिसेंबर आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली आहे.


 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -