Friday, March 29, 2024
Homeक्रीडाखेळ, व्यायाम आणि रिहॅब

खेळ, व्यायाम आणि रिहॅब

रोहित गुरव

‘पानी का पसीना किसी को पता नही चलेगा, कोच का पसीना भी पता नही चलेगा और स्विमर का भी नही’ असे जलतरणाबद्दल मुद्दाम म्हटले जाते. कारण पाण्यात घाम आला तरी तो कळत नाही. त्यामुळे जलतरूणपटूचे कष्ट वरून दिसत नाहीत. असे म्हटले जात असले तरी व्यायामासाठी जलतरण हा उत्तम पर्याय आहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यात मैदानी खेळांचे महत्त्व मोठे आहे. जलतरण हा खेळाचाच प्रकार आहे. पण खेळासह व्यायाम आणि दुखापतीतून सावरणे, तंदुरुस्ती (रिहॅब) असा तिहेरी फायदा जलतरणातून मिळतो. खेळाबरोबरच तंदुरूस्ती, व्यायामदायी लाभामुळे जलतरण हा क्रीडा प्रकार प्रत्येक खेळाशी कोणत्या ना कोणत्या कारणाने जोडला गेला आहे. विविध खेळांतील खेळाडू स्विमींग करतात. त्यामुळेच जलतरण हे सर्व खेळांचे माहेरघर आहे, असे आवर्जून म्हटले जाते. शरीर संतुलित राखण्यात जलतरण मोलाचे कार्य करते, असे जलतरण प्रशिक्षक सहदेव नेवाळकर सांगतात.

बऱ्याचदा क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी खेळाडू अन्य खेळ खेळत नाहीत. कारण ठराविक खेळांचे व्यायाम, वर्कआऊट ठरलेला असतो. तो त्या त्या खेळाशी जोडलेला असतो अथवा खेळातील शारीरिक गरजा ओळखून तसा व्यायाम केला जातो. स्विमींगमध्ये असे काही नसते. ते अन्य खेळांच्या अगदी उलटे आहे. जलतरणपटू जलतरणासह इतर कोणताही खेळ खेळू शकतो. स्विमींगमुळे अन्य खेळांत नुकसान होण्याची कोणतीच शक्यता नसते. उलट स्विमींगने पूर्ण शरीर लवचिक आणि बळकट होते. त्याचा फायदा त्या खेळाडूला कोणत्याही खेळामध्ये होतो.
अन्य खेळातील खेळाडू व्यायाम म्हणून जलतरणाला प्राधान्य देतात. कारण शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम जलतरण केल्यावर होतो. शरीर लवचिक बनते. त्यामुळे स्विमिंग केल्याने खेळताना अवयवाच्या हालचालींमधील फरक जाणवतो. शरीरातील कॅलरीज कमी करण्यासाठी स्विमींगचा उपयोग होतो. पाण्यात चालल्यानेही बऱ्यापैकी कॅलरीज कमी होतात.

सहदेव नेवाळकर सांगतात की, डॉक्टर, तणावात काम करणारे अनेकजण जलतरण करतात. तणाव दूर करण्यासाठी स्विमींगचा फायदा होतो असे तेच सांगतात. ते आवर्जून सांगतात की, स्विमींगमुळे आम्ही सर्व आजारांना पळवून लावले आहेत. त्याचा फायदा त्यांना शारीरिक तसेच मानसिकही होतो. स्विमींगमुळे दिवसभर शरीर संतुलित राहते. भूक पुरेशी लागते. त्याचा परीणाम मन आणि शरीरावर होतो. मन प्रसन्न राहते. अधिक तणावात नोकरी करणाऱ्यांसाठी स्विमींग हा रीलॅक्सेशनसाठी उत्तम पर्याय आहे. शरीरातील जडपणा, आळस नाहीसा होतो, असे ते सांगतात.

ऑलिम्पिकमध्ये जलतरणाच्या पाच प्रकारांचा समावेश आहे. फ्री स्टाइल, ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय यांसह पाचवा प्रकार पाण्याखालून पोहणे आहे. स्विमींग करणाऱ्यांची संख्या जगभरात मोठी आहे. जलतरण हा प्राचीन क्रीडा प्रकार आहे. अनेक घटनांमध्ये जलतरणाचा उल्लेख असल्याचे दाखले आहेत. फिटनेस तज्ज्ञांकडूनही जलतरण करण्याचा सल्ला दिला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -