Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीSmartphone: तुमच्या स्मार्टफोनला डब्बा बनवतात या ५ चुका

Smartphone: तुमच्या स्मार्टफोनला डब्बा बनवतात या ५ चुका

मुंबई: अनेकजण केवळ छंद म्हणून सतत नवनवीन फोन घेत असतात. मात्र काही जण आपल्या चुकीमुळे आपला फोन वेळेच्या आधीच खराब करतात आणि त्यामुळे त्यांना नवीन फोन खरेदी करावा लागतो. यामुळे पैसेही खर्च होतात. फोन लवकर खराब होण्याचे तसेच त्याचा परफॉर्मन्स कमी होण्याची अनेक कारणे आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा ५ चुकांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन डब्बा बनू शकतो.

सॉफ्टवेअर अपडेट्सकडे दुर्लक्ष नको

जर तुम्ही तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम आणि एप्स वेळेत अपडेट केले नाही तर याचा परिणाम फोनच्या कार्यक्षमतेवर होतो. सोबतच फोनमध्ये सुरक्षेचा धोका निर्माण होतो.

स्टोरेजला ओव्हरलोडपासून वाचवा

फोनची स्टोरेज साधारण फुल झाल्यासही याचा परफॉर्मन्स कमी होतो. फोन स्लो होतो. अशातच फोनमध्ये गरजेच्या नसलेल्या गोष्टी डिलीट करा.

जास्त एप्स इन्स्टॉल करू नका

जर फोनमध्ये गरजेपेक्षा जास्त एप्स असतील आणि बॅकग्राऊंडमध्ये असतील तर यामुळे फोन रिसोर्ज कंझ्युम करतो. सोबतच फोनच्या स्पीडवरही परिणाम होतो. अशातच ज्या एप्सचा वापर होत नाही ते डिलीट करा.

फोनची बॅटरी शून्यापर्यंत पोहोचवू नका

जर फोनची बॅटरी तुम्ही सतत शून्यापर्यंत पोहोचवली तर यामुळे प्रिमॅच्युअर बॅटरी डिग्रेडेशनचा धोका वाढतो. स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आर्यन बॅटरी २० ते ८० टक्केदरम्यान चार्जिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स देतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -