Wednesday, April 24, 2024
Homeकोकणरत्नागिरीमंडणगडात पेट्रोल, डिझेल, सीएनजीचा तुटवडा

मंडणगडात पेट्रोल, डिझेल, सीएनजीचा तुटवडा

तीन पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा; पर्यटकांची गैरसोय

मंडणगड (प्रतिनिधी) : मे महिन्याच्या उत्तरार्धाचे सुरुवातीला सलग तीन दिवसाचे सुट्टीमुळे बँकिंग व्यवहार ठप्प राहिल्याने शहरात तीन पेट्रोल पंप व एक सीएनजी पंप अस्तित्वात असतानाही इंधन तुटवड्याची समस्या जाणवून आली. यामुळे तालुकावासीय नागरिक त्रस्त झालेच मात्र बौद्ध पौर्णिमा विकेंड व लग्न कार्यक्रमाकरिता तालुक्यात आलेले बाहेरील
नागरिक इंधन नसणे व एटीएममध्ये संपलेली कॅश यामुळे त्रस्त झालेले दिसून आले.

मंगळवारी बँका सुरु झाल्या तरी इंधन तुटवड्याची समस्या मात्र पूर्वपदावर आलेली नव्हती. या कालावधीत शासकीय कोट्यातील इंधन साठाही संपलेला असल्याची माहिती पुढे आल्याने महसूल प्रशासनाने याकडे गंभीरतेने पाहणे गरजेचे झाले आहे. शहरातील सर्व पंपांवर एकाचवेळी इंधन नसण्याची समस्या निर्माण होणे, आळीपाळीने कुठल्या ना कुठल्या पंपावर पेट्रोल, डिझेल, सीएनजी गॅस संपलेला असणे या समस्या तालुकावासायींच्या अंगवळणी पडलेल्या आहेत.

तेल कंपन्याचे सध्याचे नियम व खासगी अस्थापनांवर महसूल विभागाचा कमी झालेला अंकुश यामुळे इंधन नसण्याच्या समस्या तालुक्याच्या नैमित्तीक व्यवहारांवर प्रभाव टाकणारी बनलेली आहे. या संदर्भात कोणासही अस्थापनांना प्रश्न विचारण्याचा अधिकार राहिलेला नसल्याने निरअंकुश अस्थापना व समस्याग्रस्त नागरिकांचा संघर्ष तालुक्यास नवीन राहिलेला नाही. इंधन पुरवठा करणारे सर्व पंप शहरापासून दीड ते अडीच किलोमीटर इतक्या लांबीवर असल्याने इंधन संपलेल्या वाहनांना रखडत पंप गाठावा लागतो.

पंपात इंधनच उपलब्ध नसल्याचे फलक पाहण्यास मिळणे ही बाब तालुकावासीयांच्या आता अंगवळणी पडली आहे. पंपासमोर पेट्रोल, डिझेल व गॅस भरण्यासाठी कृत्रिम कारणांनी लांबच लांब रांगा लागत आहेत. शहरातील पंपावर किती इंधन साठा आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असल्यास किती इंधनसाठा बफर स्टॉक म्हणून ठेवावे, याची वरच्यावर तपासणी तहसील कार्यालय करीत नाही का? असा प्रश्न तालुकावासीयासमोर या समस्येच्या निमित्ताने निर्माण झाला आहे.

या समस्येसंदर्भात तालुक्यात जनक्षोभ निर्माण होऊन आंदोलन होण्याची वाट तहसील कार्यालय पाहत आहे का? असा प्रश्नही निर्माण झालेला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -