Friday, March 29, 2024
HomeUncategorizedमविआच्या १५ नेत्यांची सुरक्षा काढली

मविआच्या १५ नेत्यांची सुरक्षा काढली

राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील १५ नेत्यांची सुरक्षा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने काढली आहे. शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा मात्र ‘जैसे थे’ ठेवण्यात आली आहे.

मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत झालेली वाढ हा चर्चेचा विषय ठरला आहे. नार्वेकर यांना आधी एक्स कॅटेगरीची सुरक्षा होती. आता त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

मागच्या दोन- तीन महिन्यात शिंदे सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली होती. यावरुन राजकीय वातावरण तापले असताना, मविआच्या नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

या नेत्यांची सुरक्षा काढली

  • वरुण सरदेसाई
  • छगन भुजबळ
  • बाळासाहेब थोरात
  • नितीन राऊत
  • नाना पटोले
  • जयंत पाटील
  • सतेज पाटील
  • संजय राऊत
  • विजय वडेट्टीवार
  • धनंजय मुंडे
  • भास्कर जाधव
  • नवाब मलिक
  • नरहरी झिरवळ
  • सुनिल केदारे
  • डेलकर परिवार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -