Tuesday, March 19, 2024
Homeताज्या घडामोडीRumors : मुंबईत जमावबंदीच्या अफवा

Rumors : मुंबईत जमावबंदीच्या अफवा

सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण

मुंबई : मुंबई पोलिसांकडून मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आल्याचे वृत्त काल विविध माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. दरम्यान, ही बातमी खोटी (Rumors) असल्याचे माहिती मुंबई शहरचे सहपोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आल्याचे वृत्त चुकीचे आणि गैरसमज निर्माण करणारे असल्याचे ते म्हणाले.

“मुंबई शहरात मुंबई पोलिसांकडून कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आल्याची बातमी आहे. ही बातमी चुकीची आणि गैरसमज निर्माण करणारी आहे. मुंबई शहरामध्ये मुंबई पोलिसांकडून मुंबई पोलीस अॅक्ट ३७ (१) अन्वये जे लोकं बेकायदेशीर मोर्चे, निदर्शने काढतात, कायदा सुवस्थेस बाधा निर्माण करतात, त्यांच्या विरोधात आदेश दर १५ दिवसांनंतर काढण्यात येतो. वर्षातल्या ३६५ दिवसांपैकी ३४१ दिवस हे आदेश जारी केलेले असतात. या आदेशांचा लोकांच्या सर्वसामान्य जीवनाशी अजिबात संबंध नसतो. यापूर्वीच कौटुंबीक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम यातून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण करून घेऊ नये”, अशी माहिती त्यांनी दिली.

काल विविध माध्यमांनी मुंबईत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने मुंबई पोलिसांकडून कलम १४४ म्हणजे जमावबंदीचे निर्देश लागू करण्यात आल्याचे वृत्त दिले होते. यादरम्यान पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास, रॅली, लाऊडस्पीकर, सर्वाजनिक सभा, विविध संघटनांच्या मोठ्या बैठका, न्यायालये आणि सरकारी कार्यालयांजवळील अनावश्यक गर्दींवर बंदी असेल, असेही सांगण्यात आले होते. मात्र ते वृत्त चुकीचे आणि गैरसमज निर्माण करणारे असल्याचे नांगरे पाटील म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -