Friday, March 29, 2024
Homeक्रीडासुवर्णपदक जिंकून पी व्ही सिंधूने रचला इतिहास

सुवर्णपदक जिंकून पी व्ही सिंधूने रचला इतिहास

नवी दिल्ली : बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकून पी व्ही सिंधूने इतिहास रचला आहे. भारताने हे १९ वे सुवर्णपदक आहे.

बॅडमिंटनमधील महिला एकेरीचा अंतिम सामन्यात भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना कॅनडाच्या मिशेल लीशी झाला. पी व्ही सिंधूने महिला एकेरीच्या लढतीत कॅनडाच्या मिशेल लीचा २१-१५, २१-१३ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

विशेष म्हणजे सिंधूने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. पी व्ही सिंधूने पहिला गेम २१-१५ अशा फरकाने जिंकला. दुखापतीनंतरही सिंधू चांगली कामगिरी करत होती. दुसऱ्या गेममध्येही तिने कॅनडाच्या मिशेल लीचा पराभव केला. यासह भारत न्यूझीलंडला मागे टाकत पदक तालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -