Saturday, April 20, 2024
Homeमहामुंबईमुंबईत २ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू

मुंबईत २ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू

मुंबई : मुंबईत २ जानेवारीपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून हा जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची निदर्शने, घोषणाबाजी आणि कार्यक्रम करण्यास मनाईदेखील असणार आहे. तसेच २ जानेवारीपर्यंत शहरात शस्त्रबंदी देखील लागू करण्यात आली आहे.

पोलिसांनी २ जानेवारीपर्यंत मुंबई शहरात कलम १४४ लागू केले आहे. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही. याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

४ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत पोलीस सतर्क

मुंबईत कलम १४४ लागू करण्याची अचानक घोषणा करण्यात आली आहे. मुंबई शहरात शांतता राहावी आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी ४ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत शहरात कलम १४४ लागू केले आहे.

यादरम्यान एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासही बंदी घालण्यात आली. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ४ डिसेंबर २०२२ ते २ जानेवारी २०२३ या कालावधीत शहरात शस्त्रे, फायर आर्म्स, तलवारी आणि इतर शस्त्रे बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर यावेळी घोषणाबाजी, निदर्शने आणि सार्वजनिक ठिकाणी गाणी सादर करण्यासही बंदी घातली आहे. तसेच लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड वाजवण्यास आणि फटाके फोडण्यास मनाई असेल. सहकारी संस्था आणि इतर संघटनांच्या सभा घेण्यास मनाई नाही. सरकारी कार्यालये, न्यायालये आणि सरकारी किंवा निमशासकीय काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आसपास ५ किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -