Saturday, April 20, 2024
Homeक्रीडाटी-ट्वेन्टी वर्ल्डकपची प्राथमिक फेरी आजपासून

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपची प्राथमिक फेरी आजपासून

ओमान-पापुआ न्यू गिनी संघांमध्ये सलामी

अल अमिरात (वृत्तसंस्था) : आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या प्राथमिक फेरी (राउंड १) रविवारपासून (१७ ऑक्टोबर) अल अमिरात क्रिकेट स्टेडियममध्ये (मस्कत, ओमान) खेळली जाणार आहे. पहिल्या दिवशी दोन सामने होतील. त्यात पहिल्या सामन्यात यजमान ओमान संघ पापुआ न्यू गिनी संघाशी दोन हात करतील. दुसऱ्या लढतीत बांगलादेशची गाठ स्कॉटलंडशी पडेल.

पाच वर्षांनी प्रथम विश्वचषक स्पर्धा

आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप पाच वर्षांनी खेळला जात आहे. २०१८मध्ये होणारी स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. युएई आणि ओमानमध्ये हा वर्ल्डकप होत असला तरी यजमानपद बीसीसीआयकडे आहे. २०१६मध्ये कार्लोस ब्राथवेटच्या वादळी खेळीने अंतिम फेरीत इंग्लंडला हरवून वेस्ट इंडिजला जेतेपद पटकावले. आयसीसी पुरुष टी-ट्वेन्टी वर्ल्डकपचे सलग दुसरे जेतेपद मिळवणारा वेस्ट इंडिज पहिला संघ आहे. त्यांनी वनडे प्रकारात १९७५ आणि १९७९ असे दोन वर्ल्डकपही जिंकले आहेत. मात्र, १९८३मध्ये भारताने त्यांना हॅटट्रिकपासून रोखले.

यंदाचा वर्ल्डकप तीन टप्प्यांमध्ये

यंदाचा वर्ल्डकप तीन टप्प्यांमध्ये होईल. राउंड १मध्ये आठ संघ आमनेसामने आहेत. त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली. प्रत्येक संघ गटातील प्रतिस्पर्ध्यांशी भिडतील. त्यातून दोन अव्वल संघ मुख्य फेरीसाठी (सुपर १२) पात्र ठरतील. सुपर १२ फेरीमध्ये सुपर १२मध्ये ३० सामने होतील. या स्पर्धेत विजयी संघाला दोन गुण मिळतील. बरोबरी, अनिर्णित किंवा रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळेल.पराभूत संघाला एकही गुण मिळणार नाही. अशी गुणपद्धत असेल. उपांत्य फेरीतील व अंतिम फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त कोणत्याच सामन्याला राखीव दिवस नाही.

विजेत्याला १२.२ कोटी; एकूण ४२ कोटींची बक्षिसे

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील विजेत्या संघाला १.६ मिलियन डॉलर म्हणजेच १२.२ कोटी रुपये मिळतील. उपविजेत्याला ८ मिलियन डॉलर म्हणजेच ६.१ कोटी आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी ४ मिलियन डॉलर म्हणजे ३ कोटी मिळणार आहेत. या स्पर्धेत एकूण ५.६ मिलियन डॉलर (४२ कोटी) बक्षीस रक्कमेचे सहभागी १६ संघांमध्ये वाटप केले जाणार आहे. सुपर १२ फेरीमध्ये प्रत्येक सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला बोनस रक्कमही दिली जाणार आहे. सुपर १२ फेरीमधून बाद होणाऱ्या संघाला प्रत्येकी ७० हजार डॉलर मिळणार, म्हणजेच ५,६०,००० रक्कम दिली जाईल.

राऊंड १ फेरी

गट अ : श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, नामिबिया

गट ब : बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, ओमान

सुपर १२ फेरी

गट १ : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अ गटातील अव्वल संघ, ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ.

गट २ : भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, अ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ, ब गटातील अव्वल संघ.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -