Friday, March 29, 2024
Homeमहत्वाची बातमीPimpri Fire : आकुर्डीत शाळेजवळील अगरबत्ती कंपनीला आग; ४०० विद्यार्थ्यांना बाहेर काढले

Pimpri Fire : आकुर्डीत शाळेजवळील अगरबत्ती कंपनीला आग; ४०० विद्यार्थ्यांना बाहेर काढले

पिंपरी : आकुर्डी येथे अगरबत्ती तयार करण्याच्या कारखान्याला आज (मंगळवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग (Pimpri Fire) लागली. शाळेला लागून असलेल्या या कारखान्यातील आगिने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. त्यामुळे शाळेतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.

पांढरकर नगर आकुर्डी येथील लोहमार्गाच्या अगरबत्तीच्या कारखान्याला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील पत्रा शेड ची काही घरांना त्याच्या झळा बसून मोठे नुकसान झाले. शाळेजवळ आग लागल्याची माहिती मिळतात विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काही नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीचे लोट आणि धूर मोठ्या प्रमाणात असल्याने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली. मात्र अग्निशामक दल पोलीस आणि महापालिका अधिकारी यांच्याकडून दिलासा दिला जात आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -