Tuesday, April 23, 2024
Homeताज्या घडामोडी२० ते २४ डिसेंबरदरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा

२० ते २४ डिसेंबरदरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा

वर्धा (हिं.स.) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा यांचे मार्फत २० ते २४ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्यामध्ये एसएसएम फार्मुलेशन प्रा.लि.कंपनी वणी, गिमाटेक्स टेक्सटाईल्स इंडस्ट्रिज हिंगणघाट व वणी, एमडिएसएचजी मार्केटिंग कंपनी, नवकिसान बायो प्लाँट नागपूर, युरेका फोरबेस नागपूर, डिमार्ट, ध्रुत ट्रास्मिशन, ईत्यादी कंपन्या सहभागी होणार असून सदर कंपन्यामध्ये रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक पात्र पुरुष व महिला उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सहभाग नोंदवावा. मुलाखती व निवड प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभाग घेण्याकरीता एसएससी पास, नापास, पदवी, पदवीका आयटीआय, डिप्लोमा, डिग्री धारण केलेल्या उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावार ऑनलाईन नोंदणी करून सहभागी व्हावे, याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 07152-242756 अथवा wardharojgar@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -