Tuesday, April 23, 2024
Homeताज्या घडामोडीदेशातील ओमायक्रॉन व्हेरियंट बाधितांची संख्या @ १४५

देशातील ओमायक्रॉन व्हेरियंट बाधितांची संख्या @ १४५

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण वाढत असून ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या १४५ झाली आहे.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. शनिवारी ओमायक्रॉनच्या ८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही ४८ वर पोहोचली आहे. राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण ४८ रुग्णांपैकी मुंबई येथे १८, पिंपरी चिंचवड येथे १०, पुणे ग्रामीण येथे ६, पुणे मनपा क्षेत्रात ३ कल्याण डोंबिवली येथे २, उस्मानाबाद २, बुलढाणा २, नागपूर १, लातूर १ आणि वसई विरार येथे १ अशा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी २८ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

ओमायक्रॉनग्रस्तांची राज्यनिहाय आकडेवारी

महाराष्ट्र – 48

दिल्ली – 22

तेलंगणा – 20

राजस्थान – 17

कर्नाटक – 14

केरळ – 11

गुजरात – 07

उत्तर प्रदेश – 02

आंध्र प्रदेश – 01

चंदीगड – 01

तामिळनाडू – 01

पश्चिम बंगाल – 01

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -