Friday, March 29, 2024
Homeक्रीडानोवाक जोकोविचचा दुस-यांदा व्हिसा रद्द

नोवाक जोकोविचचा दुस-यांदा व्हिसा रद्द

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याच्या आशा संपुष्टात

मेलबर्न (वृत्तसंस्था): ऑस्ट्रेलिया सरकारने सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचचा व्हिसा रद्द केला आहे. दुसऱ्यांदा व्हिसा रद्द झाल्याने एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या खेळाडूच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

जोकोविचचा व्हिसा शुक्रवारी दुसऱ्यांदा रद्द करण्यात आला. जनहितार्थ हे पाऊल उचलल्याचे ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन मंत्र्यांनी म्हटले आहे. जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा गेल्या आठवड्यातील निर्णय सोमवारी फेडरल सर्किट कोर्टात रद्द करण्यात आला, पण फेडरल इमिग्रेशन मंत्री अॅलेक्स हॉक यांनी जोकोविचला देशात राहण्याची परवानगी आहे की नाही यावर अंतिम निर्णय घेणार होते. ऑस्ट्रेलियन समुदायाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी जोकोविच हा धोका आहे की नाही हे ठरवण्याचे काम हॉक यांच्याकडे सोपवण्यात आले होते. अखेरीस हॉक यांनी शुक्रवारी दुपारी निर्णय दिला. त्यांनी त्यांच्या विवेकाधिकाराचा वापर केला आणि जोकोविचला ताबडतोब हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, ऑस्ट्रेलियन सरकार जोकोविचला तत्काळ देशाबाहेर पाठवणार की त्याला येथे राहण्याची संधी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जोकोविच अजूनही ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देऊ शकतो. परंतु, दुसऱ्यांदा व्हिसा रद्द झाल्याने जोकोविचच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याच्या आशा संपल्या आहेत.
जोकोविचचे व्हिसा प्रकरण न्यायालयात असले तरी ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांनी त्याला थेट मुख्य ड्रॉमध्ये स्थान दिल्याने टेनिसप्रेमींच्या आशा उंचावल्या होत्या. यंदा अव्वल रँकिंग असल्याने जोकोविचला विक्रमी २१वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -