Thursday, April 25, 2024
Homeताज्या घडामोडीनो दारू, नो वाइन, प्या दूध राहा फाईन

नो दारू, नो वाइन, प्या दूध राहा फाईन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम

डोंबिवली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती डोंबिवली शाखेच्या वतीने ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या उपक्रमा अंतर्गत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ‘द दारुचा नव्हे द दुधाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नो दारू नो वाइन, प्या दूध राहा फाईन, द दारूचा नव्हे, तर द दुधाचा, हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी न्यू इयर, नो दारू नो बियर अशी घोषणाबाजी करण्यात आली.

या कार्यक्रमांतर्गत नागरिकांना दूध वाटप करण्यात आले. नववर्षाचे स्वागत करताना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला व या उपक्रमाबद्दल आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या. अनेकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत जोडून घेण्यासाठी नाव नोंदणी केल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख यांनी दिली.

कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या ट्रस्टचे ट्रस्टी गणेश चिंचोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रोहित दादा सामंत, डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, शशिकांत म्हात्रे, निमेश पाटील, सुशील सामंत, अंनिसचा कार्यकर्त्या व कवयित्री अनिता देशमुख, नितीन सोनवणे, उदय देशमुख, संध्या देशमुख आदी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -