Wednesday, April 24, 2024
Homeदेशन्यूझीलंडच्या रॉस टेलरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

न्यूझीलंडच्या रॉस टेलरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : न्यूझीलंडचा खेळाडू रॉस टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. रॉस टेलरने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली.

मी बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांनंतर आणि ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्सविरुद्धच्या 6 एकदिवसीय सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. गेल्या १७ वर्षापासून मला पाठिंबा दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ही बाब माझ्यासाठी अभिमानाची आणि गर्वाची आहे, असे ट्वीटमध्ये त्याने म्हटले आहे.

रॉस टेलरने एकूण ४४५ सामने खेळले असून यामध्ये त्याने एकूण १८ हजार ०७४ धावा केल्या आहे. यामध्ये रॉस टेलरने एकूण ४० शतके केली आहेत. तिन्ही फॉर्मेटमध्ये १००हून अधिक सामने खेळणारा रॉस टेलर हा जगातील एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -