Thursday, April 25, 2024
Homeमहामुंबईजुलै महिन्यात २२५ शाळांमध्ये विशेष कोवीड लसीकरण मोहीम

जुलै महिन्यात २२५ शाळांमध्ये विशेष कोवीड लसीकरण मोहीम

नवी मुंबई (हिं.स.) : कोव्हीड लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करीत जलद आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. १८ वर्षावरील नागरिकांच्या दोन्ही डोसची उद्दिष्टपूर्ती करणारी नवी मुंबई ही राज्यातील प्रथम क्रमांकाची महानगरपालिका ठरली. लहान मुलांच्या लसीकरणाकडेही महानगरपालिकेने तशाच प्रकारे काटेकोर लक्ष देत १०० टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट नजरसमोर ठेवले आहे.

यामध्ये १५ ते १८ वयोगटातील ८०९७३ कुमारवयीन मुलांना (११०.३६%) पहिला डोस देण्यात आला असून ६४९४६ मुलांना (८८.५०%) दुसरा डोस देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे १२ ते १४ वयोगटातील ३९५१० मुलांना (८३.२५%) पहिला डोस तसेच २८९७७ मुलांना (६१.०५%) दुसरा डोस देण्यात आलेला आहे.

सध्या शाळांना सुरुवात झालेली असून लसीकरणाची १०० टक्के उद्दिष्टपूर्ती व्हावी याकरिता ३० जुलै पर्यंत शालेय विद्यार्थ्यांकरिता विशेष कोव्हीड १९ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. १ जुलै ते ३० जुलै या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२५ शाळांमध्ये लसीकरणाचे दिनांकनिहाय वेळापत्रक तयार कऱण्यात आले आहे. या महिन्याभरात २९६४६ मुलांना लसीकरण कऱण्यात येणार आहे. आज पहिल्या दिवशी न्यु होरायझन पब्लिक स्कूल, सेक्टर १९, ऐरोली येथे शालेय मुलांचे विशेष मोहिमेअंतर्गत लसीकरण कऱण्यात आले.

यामध्ये १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोर्बिव्हॅक्स लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार असून १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे १ जून २०२२ पासून हर घर दस्तक मोहीम २ राबविण्यास सुरुवात झाली असून त्या अंतर्गत ३३१८ नागरिकांचे लसीकरण कऱण्यात आले आहे. त्यामध्ये १८ वर्षावरील ११६३ नागरिकांना कोव्हीड लसीचा दुसरा डोस तसेच १२ ते १८ वयोगटातील १९० मुलांना कोव्हीड लसीचा पहिला डोस आणि ४३३ मुलांना कोव्हीड लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे १५३२ आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे व ६० वर्षावरील नागरिक यांना प्रिकॉशन डोस देण्यात आलेला आहे.

आत्तापर्यंत १३ लाख ७६ हजार ११७ नागरिकांनी पहिला डोस, १२ लाख ३१ हजार ३१५ नागरिकांनी दुसरा डोस तसेच ९३ हजार १०४ नागरिकांनी तिसरा म्हणजेच प्रिकॉशन डोस घेतलेला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -