Tuesday, April 23, 2024
Homeताज्या घडामोडीसेतूबाधित प्रकल्पग्रस्त संघटना आणि एमएमआरडीए यांच्यात सकारात्मक बैठक

सेतूबाधित प्रकल्पग्रस्त संघटना आणि एमएमआरडीए यांच्यात सकारात्मक बैठक

पनवेल: न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटना आणि एमएमआरडीएचे अधिकारी यांच्यात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी (दि. ४) बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सकारात्मक चर्चा झाली.
या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सेतू प्रकल्पात बाधित होत असलेल्या उर्वरित मच्छीमारांनाही नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली.

ते म्हणाले की, सेतूमुळे बाधित होणाऱ्या गव्हाण, न्हावा, जासई, वहाळ, उलवे, तरघर, मोहा, मोरावे परिसरातील सर्व मच्छीमारांना न्याय मिळाला पाहिजे. ज्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही त्यांना ती मिळावी यासाठी एमएमआरडीएकडून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी. यावर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पात्र मच्छीमारांची कागदपत्रे तपासून ती पुढे पाठवू, तसेच या प्रक्रियेसाठी मंगळवारी व गुरुवारी येथे येऊन पडताळणी करू, असे आश्वासन दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -