धगधगणारा शब्दसूर्य

रक्तवृक्ष

namdeo dhasal

कवी, लेखक किंवा अन्य कोणताही कलावंत जेव्हा ‘व्यक्त’ होतो, तेव्हा त्याच्या त्या अभिव्यक्तीमागे असंख्य प्रेरणा असतात. त्यातील ब-याच प्रेरणा खुद्द कवी वा कलावंताला पण अनोळखी असतात. त्यामुळे जेव्हा एखादा समीक्षक कवितेची वा चित्राची समीक्षा करतो तेव्हा तो हमखास चुकीच्या निष्कर्षावर काथ्याकूट करत बसतो. नामदेव ढसाळ या महाकवीच्या कवितांनी तर मराठीतील मर्यादित भावविश्वाला गावकुसाबाहेरील अफाट अवकाशाचे […]

तुकारामांनंतरचा महाकवी

namdeo dhasal 1

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान हा नामदेवच्या कवितेचा केंद्रबिंदू होता. त्याच्या कवितांमधून व्यक्त झालेला ज्वालाग्राही विद्रोह हासुद्धा आंबेडकरांच्या प्रेरणेतूनच निर्माण झाला होता. लौकिकार्थाने त्याची कविता आणि एकूणच साहित्यविश्व हे जरी भारतीय जातिव्यवस्था आणि अस्पृश्यतेच्या विरोधातील आणि त्यातून निर्माण झालेल्या शोषणाविरुद्ध असले तरी त्यांच्या कवितेचा आशय वैश्विक पातळीवर संपूर्ण जग सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्त व्हावे हाच […]

एक ‘अपूर्ण’ राहिलेली मुलाखत

namdeo dhasal

सहा महिन्यांपूर्वी नामदेव ढसाळ यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यांची ही पहिलीच मुलाखत त्यांच्याशी झालेली ‘थेट भेट’ ठरली. परंतु त्यांचा आग्रह असूनही परत भेटीचा योग आला नाही, ही गोष्ट रुखरुख लावणारी..

युग ढसाळ नामेदवाचे!

namdeo dhasal 2

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकदा विदर्भ साहित्य संघाच्या नागपूर कार्यालयाला भेट दिली, तेव्हा त्यांनी मराठी साहित्यिकांना उद्देशून एक संदेश लिहिला होता, की ‘‘आपल्या अवतीभोवती दलितांचे, पददलितांचे आणि वंचितांचे एक मोठे जग अस्तित्वात आहे. त्यांचे दु:ख, दारिद्रय़ आपल्या साहित्यात परावर्तित करा.’’ बाबासाहेबांचा हा संदेश मराठी साहित्यिकांनी दुर्लक्षित केला, कारण या परंपरागत आक्रोशाचा एक ओरखडासुद्धा या साहित्यात […]

 

दु:खितांच्या हाती दिली मशाल..

namdeo dhasal (2)

भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी पीडित, शोषित समाजाच्या वेदना आपल्या कादंब-यांतून मांडल्या. या समाजाचं दु:ख कवितेतून मांडणा-या ढसाळ यांना त्यांनी केलेला सलाम-

 

 

कडाडणा-या विजा कवेत घेणारा काळद्रष्टा कवी

namdeo dhasal (2)

वंचितांच्या वाटेत होता वर्षानुवर्षाचा लख्ख म्हातारा काळोख. काळोखाच्या वाटेत लखलखत्या सूर्याची पेरणी करणं सोपं नव्हतं. अभिव्यक्तीची जमीन नवीन अन्याय, अत्याचारांच्या परंपरागत काटेखळग्यांनी व्यापलेली होती. झाडंझुडपं, दगडधोंडे काढून तिला समान करणं सोपं नव्हतं. नांगरणी, वखरणी, वेचणी. ढीगभर कामं होती. ढसाळ नावाचा झंझावात जन्माला आला. त्याच्या क्रांतिकारी शब्दांनी हे आभाळाएवढं काम प्रतिकूल ऋतूंच्या नाकावर टिच्चून तडीस नेलं.

तो जे जगला, त्याची कविता झाली

namdeo dhasal (5)

नामदेव लघुअनियतकालिकांच्या चळवळीत थोडा उशिरा आला. पण, त्याने सगळय़ांनाच मागे टाकले. त्याचे कारण होते की, नामदेवने जे जे भोगले अगदी जसेच्या तसे त्याच्या कवितेतून मांडले. त्याच्या प्रत्येक अनुभवाची कविता झाली. तो जन्मजात कवी होता. तो औलोकिक प्रतिभेचा कवी होता. त्याला इतके सगळे सुचते कसे असा प्रश्न मला पडायचा.. एक साहित्यिक, व्यक्ती, मित्र आणि माणूस म्हणून […]

ढसाळ, बरे झाले तुमची कविता आम्हाला कळली नाही ते!

photo

ढसाळ, पैलेछूट सांगून टाकतो ढसाळ तुमची कविता अजिबात कळली नाही आम्हाला तुम्ही काहीबाही लिहायचात गांडूबगिचा आणि गोलपिठा वगैरे मुंबईला प्रिय रांडे म्हणायचात द पोएट ऑफ द अंडरवर्ल्ड तुमच्याआधी ते सुर्वेमास्तर का कोण तेही असेच भाकरीचा चंद्र म्हणायचे ते कसले हो तुमचे शब्द आणि कसली तुमची कविता नाही कळली तेच बरे झाले उगाच ठेच लागली असती […]

नामदेव, पँथर आणि मी

namdeo dhasal (2)

मैदानात लढणा-या सैनिकाला ‘तू असं लढ तसं लढ’ हे युद्धात नसणा-या रिंगणाबाहेर असलेल्यानं सांगणं चूक आहे. तसं फिल्म किंवा नाटक करताना त्यानंच काय दुस-या कोणीही ढवळाढवळ केलेली मला काय किंवा कुठल्याच क्रिएटिव्ह माणसाला खपणार नाही, तसंच.. पण तरीही सांसारिक जबाबदारी म्हणून मीही ‘सामना’मध्ये नोकरी पत्करलीच नं. पण ती नोकरी. पण तरीही तत्त्वनिष्ठतेचा आव आणणा-या काही […]

भन्नाट

namdeo dhasal

नामदेव ढसाळ कवी होते.. लेखक होते..विचारवंत होते..बरेच काही होते. पण मला मात्र ते प्रख्यात चित्रकार पाब्लो पिकासोसारखे वाटले. बिनधास्त भन्नाटपणे ते जगले. कुणाची तमा त्यांनी बाळगली नाही. मनसोक्त जगले. असं जगणं फार क्वचित कुणाच्या वाटयाला येतं. या महान माणसाच्या जगण्याशी मी थोडा फार का होईना साक्षीदार होतो.

एक अढळ कवी

namdeo dhasal 01

नामदेव ढसाळांना इतर दलित साहित्यिकांना जी बाधा झाली ती का नाही झाली? याचे कारण त्यांच्या पिंडात आहे. ढसाळ हे विचाराने आंबेडकरवादी असले तरी वृत्तीने अतिवास्तवादी पद्धतीने लिहिणारे अस्तित्ववादी साहित्यिकच होते.

 

 

कम्युनिस्ट पँथर

namdeo dhasal

नामदेव ढसाळांनी ज्या प्रतिमांचा वापर केला, त्या प्रखर आणि आक्रमक होत्या. त्यांची शैलीही अनोखी होती. यामुळेच त्या शैलीचे नंतर अनेकांनी अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. मर्ढेकर, ग्रेस यांच्याप्रमाणेच दलित शैलीचे वर्णन करायचे झाले तर नामदेव ढसाळच्या शैलीचा उल्लेख करावा लागेल.

 

अखेपर्यंत हात हातातच होता!

Namdeo Laxman Dhasal

सलीम हे ढसाळ यांचे ड्रायव्हर. अनेक वर्ष ढसाळांकडे काम करणारे सलीम त्यांच्या कुटुंबातलेच एक झाले होते. ढसाळ यांच्या सगळ्या प्रसंगाचे ते साक्षीदार ठरले होते. ढसाळ यांचे त्यांनी रेखाटलेले शब्दचित्र

 

 

माझी सिमॉन द बूव्हॉ!

last page

मराठी कर्तृत्ववान पुरुषांनी आपल्या आयुष्याबद्दल पुष्कळच लिहिलं, पण त्यातल्या अध्र्या वाटयाच्या हिस्सेकरी असलेल्या जीवनसाथीबद्दल मात्र फारसं लिहिलेलं नव्हतं. ‘प्रहार’ने याविषयीची दखल घेऊन ‘ही आणि मी’ हे खास सदर सुरू केले. त्या सदरांमधून वेगवेगळ्या क्षेत्रातले कर्तृत्ववान पुरुष त्यांच्या जीवनसाथीबद्दल, तिच्या कर्तृत्वाबद्दल आणि तिच्या साथसोबतीबद्दल त्यांच्याच शब्दांत व्यक्त झाले. पहिल्या लेखात मल्लिका अमरशेख यांच्याबद्दल नामदेव ढसाळ यांनी […]

 

सभा गाजवणारा महाकवी

namdeo dhasal (1)

नामदेव ढसाळ आणि माझी मैत्री ४० वर्षे जुनी आहे. तो पँथरच्या काळातील माझा सहकारी आहे. दलित समाजावर होणा-या अन्याय, अत्याचाराविरोधात वाचा फोडण्याचे महत्त्वाचे काम पँथरने केले

 

 

आणि मी ढसाळांची भूमिका केली!

namdeo dhasal 3

‘मुक्ता’ या चित्रपटात अविनाश नारकर यांनी ढसाळ यांची भूमिका केली होती. त्यावेळचा त्यांनी कथन केलेला हा अनुभव-

 

 

अवलिया

namdeo dhasal

एकदा त्यांच्या गाडीतून मुंबईत फिरताना गाडीतले पेट्रोल संपले. सगळ्यांनी आपापल्या खिशाची चाचपणी केली. कोणाकडेही पेट्रोल भरण्याइतके पैसे मिळेनात. आता काय करायचे, असा प्रश्न पडला. तितक्यात नामदेव माझ्या बोटातल्या अंगठीकडे पाहून मला म्हणाले, ‘काढ ती अंगठी, तुला मी त्याहून मोठी करून देतो,’ असे म्हणताच मी क्षणार्धात अंगठी काढून दिली. ती आम्ही एका सराफाकडे जाऊन विकली आणि […]

 

माणसाचे सूक्त गाणारा फकीर

namdeo dhasal 1

‘गोलपिठा’तील भाषेने तथाकथित मराठी भाषेची ऐशीतैशी करून ठेवली. आणि ढसाळ यांच्या नव्या शब्दकोशाने आमच्या पिढीची मराठीही समृद्ध केली. ढसाळ यांनी पहिल्यांदा मराठी भाषेची हवी तशी मोडतोड केली आणि तथाकथित सारस्वतांच्या मराठीला वाकवलं.