Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीखुनी आरोपीला १९ वर्षांनंतर विदेशातून अटक

खुनी आरोपीला १९ वर्षांनंतर विदेशातून अटक

नालासोपारा (वार्ताहर) : मुंबईत खून करणाऱ्या विपुल पटेल या आरोपीला युरोपमधील प्राग या शहरातून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या एका विशेष पथकाने २१ मे रोजी अटक केली. हे पथक विपुलचा ताबा घेऊन २७ मे रोजी भारतात परतले आहे. न्यायालयाने त्याला १० जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लिओन स्विडेस्की या ३३ वर्षीय अमेरिकन मॉडेलची ८ फेब्रुवारी २००३ रोजी मुंबई विमानतळावरुन अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गालगत फेकला होता.

अमेरिकन सरकारने लिओनाच्या हत्येची गंभीर दखल घेतली होती. या तपासासाठी त्यांच एक पथक मीरा रोडला पाठवले होते. याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी लिओनचा प्रियकर प्रग्नेश देसाई आणि विपुल पटेल यांना अटक केली होती. परंतु दोघेही निर्दोष सुटले होते.

अमेरिकन सरकारने गंभीर दखल घेतल्याने पोलिसांनी या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. खटल्यात प्रगती होत नव्हती. या प्रकरणाची दखल आयुक्त सदानंद दाते यांनी तपास सुरु केला. मुख्य आरोपी प्रग्नेशला बडोद्यामधून न्यायालयात हजर केले. तर विपुलला प्राग शहरातून ताब्यात घेतले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -