माही @ 32

महेंद्रसिंग ढोणी आणि क्रिकेट हे सध्या अतूट समीकरण बनले आहे. कमी कालावधीत अफाट लोकप्रियता मिळवलेल्या माही अर्थातच ढोणीचा बर्थडे आहे. त्याला ३२व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर व्हिडियोसह नजर टाकूया. 

> भारताचे प्रथमच नेतृत्व करण्याची संधी ढोणीला २००७च्या पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये मिळाली. त्यात ढोणीने भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकून दिला. (व्हिडियो)

>डिसेंबर २००९मध्ये ढोणीच्या नेतृत्वात भारताला प्रथमच आयसीसी कसोटी रॅँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकवता आले.

>ढोणीने षटकार खेचत भारताला २०११मध्ये ५० षटकांचा वर्ल्डकप जिंकून दिला. 

> भारताने नुकतीच त्याच्या नेतृत्वाखालील आयसीसी चॅँपियन्स ट्रॉफी जिंकली. तेव्हा ढोणीने यष्टयांमागे मारलेल्या उडया विशेष लक्ष वेधून घेतात. 

> ढोणीला गोलंदाजीची असलेली आवड त्याला यष्टिरक्षकाचे पॅड्स आणि ग्लोव्हज काढायला लावते. 

> ढोणीला फक्त क्रिकेटच नाही तर वेगात बाइक चालवायचाही छंद आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने माही रेसिंग टीमचे मोठया थाटात लॉँचिंग केले. विशेष म्हणजे त्याची टीम आंतरराष्ट्रीय स्तरावर दिवसेंदिवस चांगली कामगिरी करत आहे. 

 

> ढोणीचे हेलिकॉप्टर शॉट विशेष लोकप्रिय आहेत. 

* ढोणीच्या अनोख्या हेअरस्टाइल हा नेहमीच चर्चेचा विषय 

* त्यातच ५० षटकांचा वर्ल्डकप जिंकल्यानंतर केलेले मुंडन 


————–
क्रिकेटबाहेरील जग

> ढोणी हा जगातील श्रीमंत क्रीडापटूंमध्ये १६व्या स्थानी असल्याचे नुकतेच ‘फोर्ब्स’ने जाहीर केले.
> ढोणी इंडिया सिमेंट्सचा उपाध्यक्षही आहे.
> देवभक्त ढोणी :ढोणी हा जेव्हा रांचीतमध्ये असतो तेव्हा देवरी मंदिराला नेहमी भेट देतो. ढोणीच्या या भेटीमुळे हे मंदिर रांचीच्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
> इंडियन आर्मी आणि ढोणी हेदेखील एक अतूट नाते आहे. ढोणी ब-याचवेळेला आर्मीच्या गणवेशातील शर्ट, टोपी किंवा बॅग वापरताना दिसतो. त्याचा २०११मध्ये टेरिटोरियल आर्मीकडून लेफ्टनंट म्हणूनही गौरव झाला आहे.
——-

ढोणीच्या कारकीर्दीतील चढउतार

> ढोणीने २००७चा टी-२० वर्ल्डकप, आयसीसी कसोटी रॅँकिंगमध्ये अव्वल स्थान, २०११चा ५० षटकांचा वर्ल्डकप जिंकून दिल्यावर त्याला अपयशाचाही मोठा सामना करावा लागला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात त्याच्या नेतृत्वाखाली भारताला दोन्ही मालिका ०-४ या मोठया पराभवाने स्वीकाराव्या लागल्या.

>मायदेशातही गेल्यावर्षी इंग्लंडकडून भारताला कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. मात्र ‘‘नेतृत्व सोडले तर जबाबदारीपासून पळतो असे दिसेल त्यामुळे पुन्हा यश मिळवून दाखवीन,’’ हे ढोणीचे उद्गार भारताला चॅँपियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात उपयोगी पडले. फक्त इतकेच नाही तर फेब्रुवारी-मार्चमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ४-०ने जिंकली.

ढोणीच्या नावावर असलेले काही विक्रम

>ढोणी हा कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने ४९ कसोटींतून २४ कसोटी जिंकून दिल्या आहेत.

>भारताचा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक म्हणून ढोणीच्या नावावर यष्टिमागे सर्वाधिक बळींची नोंद आहे.
> भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक (२२४).

 

ढोणीची सामन्यांची आकडेवारी
कसोटी -७७
धावा – ४२०९
सर्वोच्च – २२४
१००- ६
५०-२८
यष्टिमागे विकेट्स – २४८
वनडे – २२५
धावा – ७३१३
सर्वोच्च – नाबाद १८३
१००- ८
५०- ४८
यष्टिमागे विकेट्स – २८४
टी-२० – ४२
धावा – ७४८
यष्टिमागे विकेट्स – २९