Tuesday, April 16, 2024
Homeताज्या घडामोडीसैनिक शाळांच्या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

सैनिक शाळांच्या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

नवी दिल्ली : सैनिक शाळांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने गांधीनगरच्या भारतीय शिक्षक शिक्षण संस्थेसोबत (IITE) सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर नवी दिल्ली येथे सह सचिव (जमीन आणि बांधकाम) आणि सैनिक स्कूल सोसायटी (SSS) चे मानद सचिव राकेश मित्तल यांनी संरक्षण मंत्रालय आणि भारतीय शिक्षक शिक्षण संस्थेचे निबंधक डॉ हिमांशू पटेल यांच्या वतीने संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि भारतीय शिक्षक शिक्षण संस्थेचे कुलगुरू डॉ हर्षद ए पटेल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. यावेळी संरक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव निवेदिता शुक्ला वर्मा आणि इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.

भारतीय नीतीमूल्यांची समज असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने सैनिक शाळांच्या शिक्षकांची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगून संरक्षण सचिव म्हणाले की, यामुळे केवळ विद्यमान सैनिक शाळांचाच नव्हे तर आगामी 100 शाळांचाही दर्जा वाढण्यास मदत होईल.

हा सामंजस्य करार जानेवारी 2022 पासून सुरू होणार्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे ज्या अंतर्गत सर्व सैनिक शाळांमधील 800 हून अधिक शिक्षकांना ‘गुरुदीक्षा’ आणि ‘प्रतिबद्धता’ नावाच्या अभ्यासक्रमांद्वारे प्रशिक्षित केले जाईल.

या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश म्हणजे भावी शिक्षकांना भारतीय परंपरेच्या बदलत्या ज्ञानाने समृद्ध करणे आणि शिक्षकांच्या संपूर्ण विकासावर लक्ष केंद्रित करून शिक्षक शिक्षणाच्या नवीन युगाची सुरुवात करणे हा आहे.

सामंजस्य कराराची काही ठळक वैशिष्ट्ये

शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी.

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास.

UPSC-NDA तयारी आणि CBSE अभ्यासक्रमासाठी वेळेचे व्यवस्थापन.

शैक्षणिक विषयांसाठी योग्य अध्यापनशास्त्रांची निवड.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उत्तेजन आणि प्रेरणा देणे

धडयाच्या नियोजनाचे मूल्यांकन धोरणे.

मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक मतभेद, भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या हाताळणे.

पालकांशी एक मार्गदर्शक म्हणून वागणे.

बोर्डिंग स्कूलच्या वातावरणात शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळा वाढवणे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -