Tuesday, April 23, 2024
Homeताज्या घडामोडीअफ्रिकेतील घाना देशात मारबर्ग विषाणूचा संसर्ग; डब्ल्यूएचओ कडून अलर्ट

अफ्रिकेतील घाना देशात मारबर्ग विषाणूचा संसर्ग; डब्ल्यूएचओ कडून अलर्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वच देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना आता आणखी एका व्हायरसने जगाचे टेन्शन वाढवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना आणि इबोलाहून अधिक जीवघेणा हा व्हायरस असल्याचे म्हटले जात आहे. पश्चिम अफ्रिकेतील घाना देशात ‘मारबर्ग’ या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

घानातील दक्षिण अशांती भागात या विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे या विषाणूचा संसर्ग वेग आणि मृत्यूदर अधिक असल्याने जागतिक आरोग्य संघटनेनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मारबर्ग विषाणू संसर्ग झालेल्या प्राण्यामधूनही पसरतो. यात वटवाघळाचाही समावेश आहे. हा विषाणू ज्याला संसर्ग झाला त्याच्यावर वेगाने परिणाम करतो. यामुळे बाधित व्यक्तिला तीव्र ताप, अंतर्गत व बाह्य रक्तस्राव आणि गंभीर डोकेदुखीचा त्रास जाणवतो.

मारबर्ग विषाणू इबोला विषाणू इतकाच जीवघेणा आहे आणि त्यावर अद्याप कोणतेही औषधोपचार किंवा लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत अलर्ट जारी केला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, मारबर्ग विषाणूबाबत त्वरित खबरदारी न घेतल्यास या विषाणूच्या प्रसारामुळे परिस्थिती अनियंत्रणात येऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -