Friday, April 19, 2024
HomeदेशMadhya pradesh CM: मोहन यादव बनले मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, जाणून घ्या...

Madhya pradesh CM: मोहन यादव बनले मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

भोपाळ: मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण याबाबतचा सस्पेन्स सोमवारी ११ नोव्हेंबरला अखेर संपला. उज्जैन दक्षिण येथील भाजप आमदार मोहन यादव यांच्या गळ्यात अखेर मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. दीर्घकाळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांच्या जागी मध्य प्रदेशची कमान भाजपने मोहन यादव यांच्याकडे सोपवली. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल या गोष्टी

लोकांनी टाकला विश्वास

मोहन यादव मध्य प्रदेशच्या उज्जैन दक्षिण येथून सलग तीन वेळा निवडणूक जिंकले आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उज्जैन दक्षिण येथून काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांना १२ हजार ९४१ मतांनी हरवले होते. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मोहन यादव यांना ९५ हजार ६९९ मते मिळाली होती.

ओबीसी समाजातील नेते

मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री निवडीमागचे कारण म्हणजे ओबीसी समाजातील ेते. तेथे ओबीसीची लोकसंख्या ४८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. भाजप २००३ नंतर मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी ओबीसी नेत्यांसोबत गेली आहे.

आरएसएसच्या जवळ

मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहेत. त्यांनी १९९३ ते १९९५ पर्यंत आरएसएससाठी काम केले आहे. यादव माधव विज्ञान महाविद्यालय छात्रसंघाचे सह सचिव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उज्जैनचे नगर मंत्री राहिले आहेत.

कोणत्याही वादात नाव नाही

मोहन यादव यांचे कोणत्याही वादात नाव आलेले नाही. याशिवाय ते मध्य प्रदेश सरकारमध्ये २०२० ते २०२३ दरम्यान शिक्षण मंत्री राहिले आहेत. त्यांच्या शिक्षणाबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी एमबीए आणि पीएचडी केली आहे.

मोहन यादव यांनी १९९७मध्ये भाजपमध्ये येत राजकारणाला सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. भाजपने या राज्यात २३० जागांपैकी १६३ जागांवर विजय मिळवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -