Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीकेतकीला जामिन मिळूनही तुरूंगवास कायम

केतकीला जामिन मिळूनही तुरूंगवास कायम

केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालकांना नोटीस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलच्या वादग्रस्त पोस्टनंतर अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत सापडली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावरील इतर गुन्ह्यांचा तपासही सुरु आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार केतकीला अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत जामीन मंजूर करण्यात आला आहे.

२५ हजार रुपयांच्या दंडानंतर तिला जामीन मंजूर झाला असला तरी तुरुंगातून मात्र तिची सुटका अद्याप झालेली नाही. कारण एका दुसऱ्या केसची सुनावणी केतकीविरुद्ध सुरु असून ही सुनावणी २१ जून रोजी होणार असल्याने ती अद्यापही जेलमध्येच राहणार आहे.

दुसरीकडे केंद्रीय महिला आयोगानेही या प्रकरणात उडी घेत पोलीस महासंचालक रजनीस सेठ यांना नोटीस पाठवली आहे.
अभिनेत्री केतकीने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ज्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करुन तिला तुरुंगात देखील टाकण्यात आले आहे.

या प्रकरणात सतत नवनवीन अपडेट समोर येत असून नुकतच केतकीने मुंबई उच्च न्यायालयात तिला झालेली अटक बेकायदेशीर असल्याची याचिका दाखल केली. ज्यानंतर आता केंद्रीय महिला आयोगाने देखील तिच्या बाजूने येत पोलीस महासंचालक रजनीस सेठ यांना नोटीस पाठवली आहे.

दरम्यान नाशिकचा विद्यार्थी निखिल भामरे याने देखील पवारांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यावर त्यानेही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. न्यायालयाने म्हटले होते की, रोज हजारो ट्वीट केले जाता. मग प्रत्येक ट्वीटची दखल घेणार का?, असे म्हणत पवारांनाही असे विद्यार्थ्याला डांबून ठेवणे आवडणार नाही. यामुळे त्यांच्या नावाला गालबोट लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -