Saturday, April 20, 2024
Homeताज्या घडामोडी‘केडीएमसीने २७ गावांवर लादलेला मालमत्ता कर रद्द करावा’

‘केडीएमसीने २७ गावांवर लादलेला मालमत्ता कर रद्द करावा’

प्रशांत जोशी

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेने २७ गावातील जनतेच्या मालमत्ता करात तब्बल दहा पटीने अधिक केलेली अवास्तव करवाढ रद्द करावी अशी विनंती राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.

याबाबत पाटील यांनी आणखी सूचित केले आहे की, या गावात जिल्हापरिषदेच्या शाळा असून महापालिका शिक्षण उपकर, शासकीय शिक्षण उपकर (निवासी) याच प्रमाणे गावांमध्ये मलप्रवाहाबाबत काहीही काम न करता मलप्रवाहकर आणि मलप्रवाह सुविधा लाभकर अशा प्रत्यक्षपणे काहीही न केलेल्या कामासाठी वेगवेगळ्या नावाने कर आकारणी केली जात आहे. या बरोबरीने पाणीपुरवठा लाभ कर, वृक्षसंवर्धन कर, पथकर अशा नावाखाली न दिलेल्या सुविधांची वसुली महापालिका करत आहे.

या आणि अशा अनेक समस्यांच्या निराकरणासाठी आणि शासनाचे लक्ष या अन्यायाकडे वेधण्यासाठी येथील भूमिपुत्रांसह जनतेने अनेकवेळा आंदोलने केलेली आहेत. २७ गावांचा विकास ही महापालिका करूच शकत नसल्याची खात्री येथील जनतेला झाली असल्याने २७ गावे कायमस्वरूपी वगळून त्याची वेगळी नगरपालिका व्हावी, या रास्त मागणीचा देखील महापालिका आणि प्रशासन यांनी खेळ मांडला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -