Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणकणकवली नगरपंचायत नवनवीन उपक्रमांची युनिव्हर्सिटी

कणकवली नगरपंचायत नवनवीन उपक्रमांची युनिव्हर्सिटी

भाजप नेते निलेश राणे यांचे गौरवोद्गार

कणकवली (प्रतिनिधी) : नावीन्यपूर्ण उपक्रमात कणकवली नगरपंचायत ही एक युनिव्हर्सिटी असून मी त्या युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. येथे आल्यावर नवीन शिकता येते, नवीन गोष्टी पाहायला मिळतात. जिल्ह्यात या नगरपंचायतीचे काम आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी काढले.

कणकवली नगरपंचायत व युथ वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून कणकवली पेट्रोल पंपाच्या समोरील फ्लाय ओव्हर ब्रिजखाली आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजारच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. बाजारपेठ उभी करणे साधी गोष्ट नाही. कोरोना काळ नुकताच संपला आहे. दिवाळी येते आहे अशा वेळी जनतेचा, व्यापाऱ्यांचा विचार करून योग्य निर्णय घेण्याची गरज असते ती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आहे. जेव्हा बाजार चालतो तेव्हा शहरे चालतात, उद्योग वाढतात, व्यापार वाढतो रोजगाराच्या संधी उभ्या होतात. जगभरात अशा गोष्टींना व्यासपीठ असते, इथे ते आपल्याला उपलब्ध करून घ्यावे लागते. युथ वेल्फेअर असोसिएशनने त्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असेही निलेश राणे म्हणाले.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, तेजस घाडीगांवकर, रोटरी अध्यक्ष डॉ. विद्याधर टायशेट्ये, व्यापारी बाबू वळंजू, बांधकाम सभापती विराज भोसले, आरोग्य सभापती संजय कामतेकर, महिला बालकल्याण सभापती ऊर्वी जाधव, पंचायत समिती सदस्य मलिंद मेस्त्री, नगरसेवक अभी मुसळे, बाबू गायकवाड, कविता राणे, मेघा गांगण, मेघा सावंत, सुप्रिया नलावडे, कविता राणे, स्वीकृत नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजप शहर अध्यक्षा प्राची कर्पे, माजी उप नगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेविका राजश्री धुमाळे, तालुका उपाध्यक्ष संजना सदडेकर, युवक जिल्हा सचिव संदीप मेस्त्री, महेंद्र मुरकर, दादा कुडतरकर, प्रभाकर कोरगावकर, आप्पा सावंत, संदीप नलावडे, विठ्ठल देसाई, सुशील पारकर, राजन परब, आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कणकवलीतील व्यापारी नागरिक उपस्थित होते.

सरकारने उद्ध्वस्त केले…

शेतकरी टिकला, तर महाराष्ट्राची भरभराट होईल. राज्यात विकासाची गंगा येईल म्हणून मायबाप शेतकऱ्यांना तारले पाहिजे.त्याच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे. राज्य आणि कोकणातील शेतकरी नैसर्गिक संकटांना सामोरे जात, जे कष्ट भोगत आहे, त्या शेतकऱ्यांना या ठाकरे सरकाने उद्धवस्त केले. शेतकरी जगला पाहिले, टिकला पाहिजे यासाठी ठाकरे सरकारने काही केले नाही. मात्र कणकवली पंचायत समितीने करून दाखवले. शेतकऱ्यांच्या हितासाठी असे गावठी आठवडा बाजारासारखे उपक्रम चालू ठेवा, असे आवाहन भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी केले. कणकवली पंचायत समिती आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित गावठी भाजी पाला, धान्य, वस्तू, खाद्यपदार्थ यांचा आठवडा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला. निलेश राणे यांच्या हस्ते फित कापून त्याचा शुभारंभ करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -