Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीबेजबाबदार मुंबईकर

बेजबाबदार मुंबईकर

७६ कोटींहून अधिक रुपयांचा दंड वसूल

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोनाचा प्रसार असतानाही मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिका, रेल्वे आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून ७६ कोटींहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ३६,९०,२३४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई एप्रिल २०२० ते ते १९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत करण्यात आली आहे.

मुंबई कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. तसेच तिसऱ्या लाटेचा धोका कमी असला तरी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अद्यापही मुंबईत सार्वजनिक ठिकाणी वावरताना किंवा रेल्वेत प्रवास करताना काही लोक मास्क वापरत नाहीत. अशा वेळी महापालिका किंवा पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. दरम्यान केवळ मुंबई महानगरपालिकेकडून ३०,३८,६०० जणांवर कारवाई करण्यात आली असून ६३,६५,९६,२०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून ६,२७,७४३ जणांवर कारवाई करण्यात आली असून १२,५५,४८,६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेकडूनही कारवाई करण्यात आली असून २३,८९१ जणांवर कारवाई केली असून यातून ५०,३९,२०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरण्याचे आवाहन पालिकेकडून वारंवार करण्यात येते. तरीही अनेकजण सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरताना दिसतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -