Tuesday, April 16, 2024
Homeदेशभारताचा घाऊक महागाईचा दर १५.०८ टक्क्यांवर

भारताचा घाऊक महागाईचा दर १५.०८ टक्क्यांवर

९ वर्षातील उच्चांक

नवी दिल्ली : भारतात किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईच्या दरानेही मोठा उच्चांक गाठला आहे. त्यानुसार, घाऊक महागाईचा दर एप्रिमध्ये १५.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

यापूर्वी मार्च महिन्यात घाऊक महागाईचा दर (ड्ब्ल्यूपीआय) १४.५५ टक्क्यांवर पोहोचला होता. तत्पूर्वी फेब्रुवारी महिन्यात हा सुधारित दर १३.४३ टक्क्यांवरुन १३.११ टक्क्यांवर पोहोचला होता. घाऊक महागाईचा दर गेल्या वर्षी एप्रिल २०२१ मध्ये १०.७४ टक्क्यांवर होता. दरम्यान, एप्रिल २०२१ पासून सलग १३ महिने घाऊक महागाईचा दर दोन आकडी राहिला आहे.

दरम्यान, गेल्यावर्षीच्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये महागाईने उच्चांक गाठला होता. खनिज तेल, धातू, कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस, खाद्य पदार्थ आणि रासायनिक पदार्थ आदींच्या किंमतीत वाढ झाल्यानं प्राथमिकदृष्ट्या महागाईत वाढ नोंदवण्यात आली होती, सरकारने आपल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.

आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये खाद्य पदार्थ्यांमध्ये ८.३५ टक्के वाढ झाली होती. त्याआधीच्या महिन्यात हा दर ८.०६ टक्क्यांवर होता. दर महिन्याला होणाऱ्या महागाईच्या वाढीमुळं पालेभाज्यांच्या किंमतीत वाढ होऊ शकते. एप्रिल महिन्यात भाज्यांचे दर २३.२४ टक्क्यांवर होते. तत्पूर्वी मार्चमध्ये हा दर १९.८८ टक्क्यांवर होता. तर बटाट्यांचा महागाई दर १९.८४ टक्के तर कांद्याच्या दरात ४.०२ टक्क्यांनी घट झाली होती. तर फळ्यांच्या दरात १०.८९ टक्के वाढ झाली जी गेल्या महिन्यात १०.६२ टक्के होती. तसेच गव्हाचे दर १४.०४ टक्क्यांवरुन १०.७० टक्क्यांवर आले आहेत. तसेच अंडी, मटण आणि मासे यांच्या दरात मार्च महिन्यातील ९.४२ टक्क्यांहून एप्रिलमध्ये ४.५० टक्क्यांनी घट झाली.

तसेच इंधन आणि ऊर्जेच्या महागाईचा दर मार्चमध्ये ३४.५२ टक्क्यांवरुन एप्रिलमध्ये ३८.६६ टक्क्यांवर पोहचला आहे. पेट्रोलच्या महागाई दरात ६०.६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एचएसडी (हाय स्पीड डिझेल) मध्ये ६६.१४ टक्के आणि एलपीजीचा दर ३८.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट्स विभागात एप्रिलमध्ये १०.८५ टक्क्यांवर पोहोचला तत्पूर्वी हा दर १०.७१ टक्के होता.

गेल्या महिन्यात किरकोळ महागाईची जी वेगळी आकडेवारी जाहीर झाली होती. त्यानुसार किरकोळ महागाईचा दर गेल्या आठ वर्षातील उच्चांक होता. जो एप्रिल २०२२ मध्ये ७.७९ टक्के इतका होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -